ETV Bharat / state

टाकाऊ प्लास्टिकच्या समस्येवर संशोधनातून विकासाचा 'रस्ता', अमरावतीच्या महाविद्यालयानं मिळविलं पेटंट

plastic road patent : प्रा. राम मेघे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाला प्लास्टिकचा रस्ता तयार करुन दाखवल्यामुळं पेटेंट मिळालं आहे. 2016 मध्ये, महाविद्यालयाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या नाविन्यपूर्ण उद्योजकता मंडळानं प्लास्टिकवर संशोधन करून रस्ता तयार केला होता.

Plastic Road
Plastic Road
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 8:12 PM IST

डॉ. श्रीकांत हरले यांची प्रतिक्रिया

अमरावती Plastic Road : ग्रामीण भागात अवजड वाहतूक कमी असल्यामुळं अशा ठिकाणी प्लास्टिकचे रस्ते सहज बांधता येतात. असाच रस्ता अमरावती येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी संचलित प्रा. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयानं करून दाखला आहे. महाविद्यालयातील विज्ञान-तंत्रज्ञान विभागाच्या नाविन्यपूर्ण उद्योजक मंडळानं प्लास्टिकवर संशोधन करत 2016 मध्ये रस्ता तयार केला आहे. त्यामुळं भारत सरकारनं या प्रयोगासाठी महाविद्यालयाला 26 फेब्रुवारीला पेटंट प्रमाणपत्र दिलं आहे.

असा आहे प्रयोग : प्लास्टिक पिशव्या वापरून रस्ते बनवण्याचा पहिला प्रयोग 2005 मध्ये आफ्रिकेत करण्यात आला होता. आफ्रिकेतील या संशोधनावर आधारित, IIT खरगपूरनं 2010 ते 2012 या काळात प्लास्टिकचा वापर करून प्लास्टिकचा रस्ता बनवण्याचा प्रयोग केला. आफ्रिकेतील रस्ता तसंच आयआयटीमधील काँक्रीटचा रस्ता त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन महाविद्यालयानं रस्ता तयार केला आहे. यात प्लास्टिकचे शेल तंतोतंत जोडण्यात आले आहेत. त्यामुळं रस्त्यावर भेग पडल्यास संपूर्ण रस्ता खराब होणार नाही. मात्र, रस्त्याचा जेवढा भाग खराब झाला तेवढाच दुरूस्त करण्यात येणार आहे. त्यामुळं उर्वरित रस्ता सुरक्षित, मजबूत राहणार आहे, असं प्राध्यापक डॉ. श्रीकांत हरले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं. प्राध्यापक डॉ. श्रीकांत हरले यांच्या मार्गदर्शनाखाली हा चार बाय वीस मीटर लांबीचा रस्ता 2016 मध्ये महाविद्यालय परिसरात तयार करण्यात आला होता.

20 टक्क्यांनी वाचतो खर्च : टाकून दिलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांची एक पट्टी तयार केल्यानंतर त्यातून सेल निर्माण करण्यात येतात. त्यानंतर या सेलचा वापर काँक्रीटचा रस्ता तयार करण्यासाठी केला जातो. या प्लॅस्टिक सेलमुळं रस्ता तयार करण्यासाठी लोखंडाची गरज भासत नाही, असं डॉ. श्रीकांत हरले सांगितलं. प्लॅस्टिकचे सेल एकामेकांना जोडून सिमेंटमध्ये चांगल्या प्रकारे फसतात. डांबरी रस्त्यांच्या तुलनेत प्लास्टिक वापरून बनवलेला रस्ता 20 टक्के खर्चात बचत करणारा आहे. तसं हा रस्ता वीस वर्षेदेखील खराब होत नाही, असंही प्रा. हरले यांनी स्पष्ट केलं.

देशाच्या प्रगतीत या संशोधनाची मदत : "ग्रामीण भागात प्लास्टिकचा वापर करून अशा स्वरूपाचा रस्ता बांधण्यासाठी आमच्या महाविद्यालयानं केलेल्या संशोधनाची मदत देशाला होईल. यामुळं आम्ही लवकरच केंद्र सरकारकडं आमच्या महाविद्यालयाचे प्रतिनिधी मंडळ पाठवून केंद्र सरकारला यासंदर्भात विनंती करणार आहोत," अशी माहिती विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन धांडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.

महाविद्यालयाला दहा पेटंट : "प्राध्यापक राम मेघे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात सुरुवातीपासूनच संशोधनाची परंपरा आहे. आमच्या महाविद्यालयानं एकूण 54 संशोधन पेटंट सादर केले आहेत. त्यापैकी दहा संशोधनांना पेटंट मिळाले," अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश हरकुट यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. आता प्लास्टिकच्या रस्त्याबाबत केलेल्या संशोधनाला पेटंट मिळाल्यानं महाविद्यालयातील संशोधकांचा उत्साह आणखी द्विगुणीत झाला असल्याचंदेखील प्राचार्य हरकुट म्हणाले.

'हे' वाचलंत का :

  1. 'पेपर फुटीत सरकारच्या सहभागाची आम्हाला शंका': अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल
  2. यशस्वी भव! उद्यापासून दहावीच्या परीक्षेला होणार सुरुवात, परीक्षेसाठी 'इतक्या' विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
  3. बोर्डाच्या परीक्षेची काळजी मुलांच्या मानसिक आरोग्यावर करू शकते परिणाम, करा हे उपाय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.