कोल्हापूर Pen Festival in Kolhapur : जगभरातील 50 हून अधिक नामांकित ब्रँडच्या पेनाचं प्रदर्शन सध्या कोल्हापुरात भरलंय. या प्रदर्शनात दोनशे रुपयांपासून ते 7 लाख रुपयापर्यंतच्या विविध आकाराचे पेन आणि दुर्मिळ शाई पाहण्यासाठी तसंच खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत.
सात लाख रुपयांचा पेन : पेन म्हणजेच लेखणी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच परिचित असणारी छोटीशी वस्तू. आपण जन्मल्यानंतर जन्म दाखल्यापासून ते थेट आपल्या मृत्यूनंतर मृत्यू दाखलापर्यंत सदैव छोटीशी वस्तू आपल्या सोबत असते. प्रत्येक व्यक्तीच्या खिशात असलेला पेन अनेकांच्या व्यक्तिमत्व देखील सांगून जात असतं. अगदी एक दोन रुपया पासून सुरु झालेला पेनाचा प्रवास हा आता लाखो रुपयांत तसंच विविध रुपयात पोहोचला आहे आणि याच पेनाचा प्रवास पाहण्याची संधी पहिल्यांदाच कोल्हापूरकरांना मिळत आहे. जगभरातील 50 हून अधिक नामांकित ब्रँडच्या पेनाचं प्रदर्शन सध्या कोल्हापुरात भरलं असून या प्रदर्शनात दोनशे रुपयांपासून ते 7 लाख रुपयापर्यंतच्या विविध आकाराचे पेन आणि दुर्मिळ शाई पाहण्यासाठी तसंच खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत.
दुर्मिळ पेनांसह पेन तज्ञांकडून माहिती : सुरुवातीच्या काळात पक्षांच्या पिसाऱ्यांपासून या पेनांचा सुरु झालेला प्रवास हा आज शाई पेन, बॉल पेन, जेल पेन ते अगदी डिजिटल पेन पर्यंत येऊन पोहोचला आहे. असं असलं तरी शाई पेनाप्रती पेन चाहात्यांचं असलेलं आकर्षण हे अद्याप कमी झालेलं नाही. अनेक मोठ्या प्रसंगी किंवा सुंदर हस्ताक्षरासाठी शाई पेनचा वापर अनेक जण करतात. यामुळं पेन चाहत्यांना विविध पेन आणि या पेनांचा प्रवास माहित व्हावा यासाठी कोल्हापुरातील हॉटेल सयाजी इथं 'बॉब अँड ची' या संस्थेच्या वतीनं हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनात जगभरातील 50 हून अधिक नामांकित ब्रँडच्या तब्बल 2 हजारांहून अधिक फॉऊंटन पेन, रोलर पेन, बॉल पेन, मेकनाईज्ड पेन्सिल्स आणि उच्च दर्जाची दुर्मिळ शाईचा समावेश असून यासोबतच पेन ठेवण्यासाठी लागणारं उच्च दर्जाचं खास पाऊस आणि केसेस ही इथं उपलब्ध करून देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या प्रदर्शनात बिहारमधील पटना येथील पेन संग्राहक तसंच पेन विश्वातील जाणकार युसूफ मन्सूर यांनी संग्रहित केलेले तब्बल 125 वर्षांपूर्वी पासूनचे पेन हे पेन चाहत्यांचे आकर्षण बिंदू ठरत आहेत.
इटली इथं तयार झालेला 7 लाख रुपये किमतीचा पेन : या पेन प्रदर्शनात सर्वाधिक आकर्षित करणारा पेन हा इटली इथं तयार झालेला 7 लाख रुपये किमतीचा पेन असून त्याचे चार प्रकारचे विविध डिझाईन पेन चाहत्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. पूर्णपणे हातानं तयार केलेल्या या पेनाची नीब ही सोन्याची आहे. हा पेन इटली येथील प्रसिद्ध कवी पॅराडाईस यांच्या जीवनावर हे पेन तयार करण्यात आलं असून जगात केवळ 333 अशा पद्धतीचं पेन तयार करण्यात आले असून भारतात 15 पेन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हा पेन पाहून कोल्हापुरातील एका पेन चहात्यानं लाखांचा हा पेन खरेदी केलाय. तसंच या पेन साठी लागणारी शाई देखील इथं पाहायला मिळतंय. तसंच किल्ल्यांचे डिझाईन केलेले, तांबा धातू पासून तयार केलेले पेन देखील इथं उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डॉ ए पी जे अब्दुल कलाम, डॉ बाबासाहेब आंबेडकर, तर पु ल देशपांडे, सिग्नेचर फाउंटन पेन, छत्रपती शिवाजी महाराज पेन व लहान मुलांसाठी चिंटूचे पेन खरेदीसाठी पेन चाहते गर्दी करत आहेत. तसंच बुलढाणा येथील हस्ताक्षर कलाकार गोपाल वाकोडे हे मराठीतून वेगवेगळ्या नावांचे वैविध्यपूर्ण स्वाक्षरी तयार करुन घेत आहेत.
हेही वाचा :