मुंबई Patra Chawl Scam Case : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला पत्र लिहिलं आहे. पत्राचाळ प्रकरणी पोलिसांना दिलेला जबाब बदलण्यासाठी संजय राऊत दबाव टाकत असल्याचा स्वप्ना पाटकर यांनी आरोप केला.आपल्या जीवाला धोका असल्याचं देखील त्यांनी पत्रात म्हटलंय. स्वप्ना पाटकर यांच्या आरोपानंतर आता पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Swapna Patkar, a witness in the Patra Chawl land case, wrote to Addition Director (Western Region), ED alleging rape and life threats to her " for changing the statements given during the investigation of the case"
— ANI (@ANI) August 31, 2024
the letter reads, "i would like to bring it to your notice that… pic.twitter.com/Q3G5pHFWTx
स्वप्ना पाटकर यांचा नेमका आरोप काय? : स्वप्ना पाटकर यांनी पत्रात संजय राऊत यांचं नाव स्पष्टपणे घेतलं आहे. ईडीच्या पश्चिम विभागाच्या अतिरिक्त संचालकांना हे पत्र लिहिलं त्यांनी लिहिलं आहे. ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, "पत्राचाळ प्रकरणातील आरोपी आणि त्यांचे गुंड मला सतत धमकावत आहेत. माझ्यावर बलात्कार केला जाईल, अशीही धमकी दिली जात आहे. इतर साक्षीदारांनाही अशाच प्रकारे धमक्या दिल्या जाण्याची शक्यता आहे. माझा जबाब बदलण्यासाठी माझ्यावर दबाव निर्माण केला जात असून, या प्रकरणातील आरोपी संजय राऊत आणि त्याच्या कुटुंबीयांवर नोंदवलेले आरोप बदलण्यासाठी हा दबाव निर्माण केला जात आहे."
काय आहे पत्राचाळ जमीन घोटाळा? : पत्रा चाळ जमिनीचा कथित घोटाळा 2007 पासून सुरू झाला. 2007 मध्ये म्हाडानं (महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरण) पत्रा चाळच्या पुनर्विकासाचं काम गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलं होतं. गोरेगावच्या सिद्धार्थनगरमध्ये हा पुनर्विकास होणार होता. म्हाडाच्या 47 एकर जमिनीवर एकूण 672 घरं बांधण्यात आली आहेत. पुनर्विकासानंतर साडेतीन हजारांहून अधिक सदनिका बांधून गुरू आशिष कंपनीला देण्यात येणार होत्या. म्हाडासाठी सदनिका बांधल्यानंतर उर्वरित जमीन खासगी विकासकांना विकायची होती. 14 वर्षांनंतरही कंपनीनं सदनिका बांधून लोकांना पुरवल्या नसल्याचा आरोप आहे. या सर्व घोटाळ्याचा तपास ईडी करत असून त्या प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत.
हेही वाचा
- ठाण्यात पुन्हा २ वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण करुन लैंगिक अत्याचार, सात महिन्यात २३३ अल्पवयीन मुली नराधमांच्या भक्ष्यस्थानी - Sexually assault
- झेड प्लस सुरक्षेवर शरद पवार यांचा आक्षेप; सुरक्षेतही काय चाललंय राजकारण? वाचा स्पेशल रिपोर्ट - objection on Z Plus security
- पंतप्रधान मोदी यांनी फक्त 'राजकीय माफी' मागितली, मनापासून नाही - संजय राऊत - Sanjay Raut on Modi