ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यातील पार्डी ग्रामस्थांचा पर्यावरण संवर्धनाचा ध्यास, सरकारकडून ''माझी वसुंधरा अभियान'' पुरस्काराने सन्मान - Pardi Villagers Bamboo production

अमरावती जिल्ह्यात मोर्शी तालुक्यातील पार्डी या गावी ई क्लास जमिनीवर बांबूची बाग चांगलीच बहरली आहे. पर्यावरण संवर्धनासह ग्रामस्थांना रोजगार मिळावा या उद्देशाने पार्डी ग्रामपंचायतने ही बाग लावली आहे. या विकासाची दखल घेत सरकारने ''माझी वसुंधरा अभियान'' पुरस्काराने गौरव केला आहे.

Pardi Villagers of Amravati District Honored
अमरावती जिल्ह्यात पार्डी येथे बांबू बाग बहरली
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 2:19 PM IST

अमरावती जिल्ह्यातील पार्डी येथे बांबू बाग बहरली

अमरावती : एका बाजूला अप्पर वर्धा धरण तर दुसऱ्या बाजूला सातपुडा पर्वत. या दोन्हीच्यामध्ये उंचावर ई क्लास जमिनीवर बांबूची बाग चांगलीच बहरत आहे. अमरावती जिल्ह्यात मोर्शी तालुक्यातील पार्डी या अवघ्या दोन अडीच हजार लोक वस्तीच्या गावामधील हे चित्र आहे. याठिकाणी ग्रामस्थांच्या प्रयत्नाने बांबूसह विविध फळवृक्ष लावण्यात आले आहे आहेत. या प्रयत्नाद्वारे पर्यावरण संवर्धनासह ग्रामस्थांना रोजगार मिळावा आणि आपल्या गावचा शाश्वत विकास व्हावा या उद्देशाने पार्डी ग्रामपंचायतची वाटचाल सुरू आहे. गावाच्या या पर्यावरण पूरक विकासाची दखल घेत शासनाच्या वतीने या गावाला ''माझी वसुंधरा अभियान'' पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

18 हजार वृक्ष लागवड : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून पार्डी गावालगत असणाऱ्या 70 पैकी 60 एकर ई क्लास जमिनीवर 18 हजार विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक 12 हजार वृक्ष हे बांबूचे आहेत. यासोबतच आयसीआयसीआय फाउंडेशनच्या वतीने मिळालेले केशर आंब्याचे 80 रोप लावण्यात आले आहेत. यासोबतच चिकू, सीताफळ, पेरू यासह कडुनिंब उंबर अशा विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. भविष्यात ही सर्व झाड वाढल्यावर गावाचा परिसर आणखी बहरणार, सुंदर दिसणार असा विश्वास ग्रामस्थांना आहे.

बांबू देणार ग्रामस्थांना रोजगाराची संधी : पार्डी गावामध्ये एकूण बारा हजार बांबूची झाडे लावण्यात आली आहेत. दोन वर्षांपूर्वी केलेल्या बांबूच्या लागवडीनंतर आता बांबू बऱ्यापैकी भरला आहे. पुढच्यावर्षी हा बांबू आणखी वाढेल. या बांबूद्वारे गावातील महिलांसाठी अगरबत्ती व्यवसाय सुरू केला जाईल, असं उपसरपंच प्रवीण ठावळी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं. अगरबत्ती व्यवसायासोबतच कुल्फीसाठी लागणाऱ्या काड्या देखील या बांबूच्या साह्याने तयार करण्याचा व्यवसाय देखील आमच्या गावातील महिलांना आम्ही उपलब्ध करून देणार असं देखील प्रवीण ठवळी म्हणाले आहेत.

पुण्यातले उद्योजक पार्डी झाले उपसरपंच : पुण्यात पेपर मिल चालवणारे प्रवीण ठवळी हे 1993 मध्ये आपले पार्डी गाव सोडून पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात आपला व्यवसाय वाढवल्यावर आपल्या गावाप्रती असणारी ओढ आणि तळमळ त्यांच्या मनात जागृत होती. गावाच्या विकासाबाबत त्यांच्या संकल्पना ऐकून ग्रामस्थांनी त्यांना 2021 मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लढवावी अशी विनंती केली. प्रवीण ठावळी यांनी अपक्ष सदस्यांना घेऊन निवडणूक लढवली आणि ग्रामस्थांनी त्यांच्या संपूर्ण पॅनलला निवडून दिले. वर्षा वानखडे ह्या सरपंच असून प्रवीण ठवळी हे उपसरपंच आहेत. योगेश इंगळे, राघवेंद्र निंभोरकर, दिनेश तायवाडे, रोशनी मोंडे, अरुणा वाळके, शीला घोंगडे सलमा बानो शेख जाकीर हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेत. प्रवीण ठवळी हे पुण्यात आपला व्यवसाय सांभाळून उपसरपंच म्हणून पारडी गावाच्या विकासासाठी अर्ध्या रात्री देखील पुण्यावरून थेट आपल्या गावी हजर होतात. त्यांच्याच संकल्पनेतून गावातील ई क्लास जमीन हिरवीगार होते आहे असं ग्रामपंचायत सदस्य राघवेंद्र निंभोरकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.

ग्रामस्थांना गावातच मिळत आहे मजुरी : पर्डी गावात लगतची जमीन ही खडकाळ आहे. ई क्लास जमिनीलगतच वनविभागाची जमीन आहे. वनविभागाच्या वतीने अनेकदा प्रयत्न करून देखील या भागात वृक्षारोपण करून वृक्ष जगवणं शक्य झालं नाही. सुदैवाने ई क्लास जमिनीवरील खडक फोडून त्या ठिकाणी लावण्यात आलेला बांबू बहरला आहे. इतर वृक्षांची मूळ देखील जमिनीच्या आत मजबूत झाले आहेत. विशेष म्हणजे गावातील मजुरी काम करणाऱ्या ग्रामस्थांना बाहेरगावी मजुरीसाठी भटकंती करण्याची गरज राहिली नाही. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून गावात झालेल्या वृक्षारोपणासाठी ग्रामस्थ मजुरांना योग्य मोबदला मिळतो आहे. आमच्या गावचा मजूर गावातच पोट भरून राहिला ही आमच्यासाठी हीआनंदाची गोष्ट असल्याची भावना रमेश तायवाडे आणि प्रफुल इंगळे यांनी व्यक्त केली.

50 लाखाचा पुरस्कार : पृथ्वी, वायू ,जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित 'माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष उपक्रमासाठी अडीच हजारापेक्षा कमी लोकसंख्या गटात मोर्शी तालुक्यातील पार्डी ग्रामपंचायतला 50 लाख रुपयांचा राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. राज्य शासनाने गावातील आपल्या उपक्रमाची दखल घेतल्यामुळे ग्रामस्थांचा आपले गाव हिरवेगार करून रोजगाराच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न आणखी बळकट झाला आहे.

हेही वाचा :

1 छत्रपती संभाजीनगरचं वैभव; पारंपरिक संगीतानं उत्साहात सुरू झाला वेरुळ अजिंठा महोत्सव

2 मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्यावा; केंद्र सरकारनं राज्य सरकार बरखास्त करावं : सुप्रिया सुळे

3 सोलापुरातील गावं कर्नाटकात जोडण्याची मागणी; निवडणुकांवरही टाकणार बहिष्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.