लातूर NEET Paper leak Case: नीट परीक्षेतील घोटाळ्या प्रकरणी नव-नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडं सोपवण्यात आलीय. अशातच वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षेत घोटाळा होण्याची भीती लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या सीईटी सेलचे संचालक दिलीप देशमुख यांनी वर्तवली होती. ई-मेलद्वारे त्यांनी याची माहिती 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'कडे (NTA) पाठवली होती. याबाबतचा दावा देशमुखांनी केल्यामुळं आणखी खळबळ उडाली आहे. दिलीप देशमुख यांच्याशी 'ई-टीव्ही भारत' ने सविस्तर संवाद केला आहे. त्यात ही माहिती पुढं आलीय.
देशातील विविध राज्यात नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड होत असताना 'नीट'च्या परीक्षेत 'माल प्रॅक्टिस' होण्याची भीती एप्रिलमध्येच व्यक्त करण्यात आली होती. कारण, महाराष्ट्रातील मुलं कर्नाटक, गुजरात, बिहार या भागात जाऊन परीक्षा देत आहेत. याबाबत एनटीएला पत्र व्यवहारही केला होता. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही असा खुलासाच दिलीप देशमुख यांनी केला आहे.
नावाजलेला 'लातूर पॅटर्न': महाराष्ट्रासह देशात नावाजलेल्या 'लातूर पॅटर्न'च्या जडणघडणीत शहरासह जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांचा सहभाग आहे. त्यामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयचे योगदान अधिक आहे. दिलीप देशमुख यांनी एप्रिल महिन्यामध्ये एनटीएला पत्र लिहून महाराष्ट्रातले अनेक विद्यार्थी कर्नाटक, गुजरात, बिहार अशा राज्यामध्ये नीटची परीक्षा द्यायला जाणार आहेत. यात रिपीटर विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यांना भरघोस मार्क मिळालेलीही अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे परिक्षेत घोटाळा होवू शकतो असे संकेत त्यांनी मेलद्वारे दिले होते. जे विद्यार्थी स्वतःच्या जिल्ह्यापासून दीड-दोन हजार किलोमीटर परराज्यात जाऊन परीक्षा देत आहेत. त्या मागची नेमकं कारणं काय? जे विद्यार्थी दोन वर्षे प्रचंड मेहनत करतात त्यांची गुण कमी असल्यामुळे त्यांना योग्य महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. या सर्व बाबी लक्षात घेता त्याची खोलवर चौकशी झाली पाहिजे होती. अशी खंतही देशमुख यांनी एनटीएबद्दल व्यक्त केली असल्याचं 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
हेही वाचा
- NEET पेपर लिक प्रकरण ; चौकशीसाठी सीबीआयचं पथक आज धडकणार लातूरमध्ये - NEET Paper Leak Case
- नीट पेपर लिक प्रकरण : विरोधकांचा नीटवरुन लोकसभेत गदारोळ, राहुल गांधी आक्रमक - Lok Sabha Session 2024
- नीट घोटाळा प्रकरण मास्टरमाईंड गंगाधर मुंडे आणि इराण्णा कोनगुलवार अटक, उद्या पहाटेपर्यंत लातूरला आणण्यात येणार - Neet Paper Leak Case