मुंबई Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे राज्यभरातून स्वागत होत असून या योजनेतील काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं सुरू आहे. शिवसेना, मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी या योजनेचा राज्यभरात प्रचार, प्रसार करत आहे. या योजनेचा शिवसेनालाच केवळ फायदा होऊ शकतो, असं लक्षात आल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी योजनेचं श्रेय घेण्यासाठी रणनीती आखल्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस साधणार महिलांशी संवाद : या योजनेचा प्रसार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोमवारी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड येथे संवाद साधणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या दौऱ्यात राज्याच्या महिला, बालविकास मंत्री अदिती तटकरे, कृषिमंत्री धनंजय मुंडे देखील असणार आहेत. मात्र, या योजनेच्या प्रचारासाठी खासदार निलेश लंके यांचा मतदारसंघ तसंच आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघातून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळं राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. याबात तटकरे म्हणाले "आम्ही कोणालाही नजरेसमोर ठेवून काहीही करत नाही. अहमदनगर जिल्हा हा सहकार क्षेत्रातील मोठा जिल्हा आहे. त्यामुळं आम्ही या जिल्ह्यातून दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
धनंजय मुंडे मुख्य प्रवक्ते पदी : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. तसंच राजेश विटेकर या नवनिर्वाचित विधान परिषद सदस्याचीही प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचं तटकरेंनी सांगितलं.
हे वाचलंत का :
- 'लाडकी बहीण' योजनेच्या नावाखाली फसवणूक; राज्यात पहिला गुन्हा दाखल - Mukhyamantri Ladki Bahin Yojana
- 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजने'च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 'सोशल' सहारा - Mukhyamantri Ladki Bahin Yojana
- 'लाडकी बहीण' योजनेच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेची आघाडी? भाजपा म्हणते... - Ladki Bahin Yojana