ETV Bharat / state

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध नाशिक युवक कॉंग्रेस आक्रमक, गृहमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे - नाशिक युवक कॉंग्रेस

Nashik Youth Congress : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नाशिक युवक कॉंग्रेसच्यावतीनं करण्यात आली आहे. (Deputy CM Devendra Fadnavis) यासाठी त्यांनी आज (10 फेब्रुवारी) नाशिकमध्ये फडणवीसांच्या गाड्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं.

Nashik Youth Congress
नाशिक युवक कॉंग्रेस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 9:21 PM IST

गृहमंत्र्यांविरुद्ध नाशिक युवक कॉंग्रेसचा एल्गार

नाशिक Nashik Youth Congress : भाजपा आमदारांनी केलेल्या विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (10 फेब्रुवारी) नाशिक दौऱ्यावर आहेत. अशात ते सायंकाळी 34 व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप करून सातपूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला जात होते. (Devendra Fadnavis Nashik Visit) यावेळी, नाशिक युवक काँग्रेसच्यावतीनं त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यानंतर पोलिसांनी आंदोलनकांना ताब्यात घेतलं.

युवक कॉंग्रेसतर्फे वाढत्या गुन्हेगारीचा निषेध : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आलेत. यांच्या उपस्थितीत नाशिक शहरात भाजपा आमदारांच्या प्रयत्नातून झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. अशात गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अकादमी जवळील चौकात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फडणवीसांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.

पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद : महाराष्ट्र पोलीस खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं नावं करत आहे. पोलिसांचं काम ताण तणावाचं आहे. खेळातून समाधान आणि खिलाडू वृत्ती मिळते. यासह संघ भावना तयार होते. कोविडमध्ये स्पर्धा बंद होत्या. अशात पोलीस खेळाडू रेकॉर्ड प्रस्थापित करत आहेत. याचा मला गृहमंत्री म्हणून अभिमान आहे, असं फडणवीसांनी पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोपाप्रसंगी म्हटलंय.

अंमली पदार्थांविरोधात लढाई लढावी लागेल : नवीन पिढीला अंमली पदार्थांपासून रोखण्याचं मोठं आव्हान आहे. भारतात अंमली पदार्थांविरुद्ध लढाई सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील अंमली पदार्थांविरोधात मोहीम उघडली आहे. राज्य सरकारला देखील या पदार्थांच्या वापराविरुद्ध लढाई लढावी लागत आहे. ही लढाई आपण जिंकू हीच तुमचाकडून अपेक्षा आहे, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना उद्देशून म्हटलं आहे.

हेही वाचा:

  1. 'नाद केला पण वाया नाय गेला'; मनोज जरांगे पाटलांची थेट अमेरिकेत हवा, 'टाइम्स स्क्वेअर'वर झळकले फोटो
  2. कितीही धमक्या आल्या, तरी मी भूमिका बदलणार नाही; छगन भुजबळांचा हल्लाबोल
  3. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून उद्धव ठाकरेंची बोचरी टीका, आता फडणवीसांनीही दिलं सणसणीत उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.