नाशिक Ramgiri Maharaj Controversy : महंत रामगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाशिक आणि अहमदनगरमध्ये अल्पसंख्यकांकडून निदर्शनं करत अटकेची मागणी करण्यात आली आहे. याचे पडसाद तीव्र होत असताना आता रामगिरींचे भक्तमंडळ देखील त्यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरल्याचं दिसून येतय.
श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव मध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थकांनी पुणतांबा-श्रीरामपूर येथे रास्ता रोको करत रामगिरी महाराजांसाठी संरक्षणाची मागणी केलीय. रामगिरी महाराजांबद्दल अपशब्द वापराल तर गावात व्यवसाय करू देणार नाही, असा आक्रमक पावित्रा खैरी निमगाव ग्रामस्थांनी घेत, कितीही गुन्हे दाखल केले तरी हरकत नाही, असा इशारा दिलाय. तसंच महाराजांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणीही यावेळी महाराजांच्या समर्थकांकडून करण्यात आली.
नेमकं प्रकरण काय : नाशिक जिल्ह्यातील शहा पंचाळे येथे सुरू असलेल्या 177वा गुरुराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहच्या प्रवाचनादरम्यान रामगिरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आहेत. अनेक ठिकाणी महाराजांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील महाराजांच्या सराला बेट या निवासस्थानी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सप्ताहाला 25 लाखाहून अधिक भाविकांची हजेरी : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहा पंचाळे या गावात गेल्या सात दिवसांपासून गुरुराज गंगागिरी महाराज यांचा 177 वा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहाची सांगता आज होणार आहे. गेल्या सात दिवसात या सप्ताहाला 25 लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावलीय.
हेही वाचा
- "संतांच्या आशीर्वादामुळंच राज्याचा कारभार, त्यांच्या केसालाही धक्का..." महंत रामगिरी महाराजांसमोर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य - mahant ramgiri maharaj News
- बोललो त्यावर ठाम, परिणामाची चिंता नाही; महंत रामगिरी महाराजांनी ठणकावलं - Mahant Ramgiri Maharaj Statement
- नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता; तगडा पोलीस बंदोबस्त तैनात, पोलिसांचं नागरिकांना आवाहन - Ramgiri Maharaj Controversy