नाशिक Nashik IG : नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी. जी. शेखर यांना कॅटमधून मोठा दिलासा मिळाला. कॅटचा निकाल शेखर पाटील यांच्या बाजूनं लागला आहे. त्यांना नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पुनःस्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं कॅटचा निकाल येण्यापूर्वीच घाईघाईनं पदभार स्वीकारणाऱ्या दत्तात्रय कराळे यांची कॅटच्या निर्णयामुळं नियुक्ती रद्द होणार आहे.
काय आहे नियम : भारतीय पोलीस सेवेतील राज्यभरातील अधिकाऱ्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या करण्यात आल्या होत्या. नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी ठाणे येथील पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. केंद्रीय बदली अधिनियमाअंतर्गत सेवानिवृत्तीला जर एक वर्ष शिल्लक राहिलं असेल तर बदली करु नये असे निर्देश आहेत. तसंच केंद्रीय निवडणूक आयोगानं सुद्धा 21 डिसेंबर 2023 ला जारी केलेल्या मार्गदर्शन तत्त्वानुसार एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीला जर सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला असेल तर त्याची बदली केली जाऊ नये, असं म्हटलं आहे. त्यामुळे बदली ही नियमाविरोधात असल्याचं शेखर यांच म्हणण होते. बी. जी. शेखर यांनी ही बाजू न्यायालयापुढं मांडली. न्यायालयानं यावर सुनावणी घेत त्यांच्या अर्ज वैध ठेवून शासनाला पुन्हा बी. जी. शेखर यांना नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी पुनः स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत.
सुनावणी नंतर दिला निकाल : न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर दोनदा सुनावणी झाली. न्यायमूर्ती एम जी सेवलीकर व सदस्य राजींदर कश्यप यांच्या पीठानं निकाल दिला. त्यानुसार डॉ बी. जी. शेखर यांच्या बदलीला स्थगिती दिली. त्यांची पुन्हा नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती दिली जावी, असे निर्देश प्रतिवादी राज्य शासनाच्या मुख्य सचिवांसह गृह मंत्रालयाच्या अप्पर सचिवांना न्यायधीकरणाकडून देण्यात आले आहेत.
हेही वाचा :