नांदगाव Nashik Accident News : नांदगाव मनमाड माहामार्गावर आज (26 सप्टेंबर) पहाटे पाच वाजेच्या दरम्यान हिरेनगर फाट्यावर दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात वाहनाचा अक्षरशः चुरा झाला. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावं अद्याप समजली नाही. तर आशा शिवाजी देशमुख (वय 55, रा. मोहाडी). विकास शिवाजी देशमुख (वय 35, रा. मोहाडी), नारायण सुखदेव महाजन (वय 70, रा. पाचोरा), गराबाई अधिक देशमुख (वय 60, रा. मोहाडी) अशी चार जखमींची नावं आहेत. घटनेची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीनं त्यांनी जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केलं. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
बातमी अपडेट होत आहे...
हेही वाचा -