ETV Bharat / state

'बदलापूर ते मालवण पुतळा दुर्घटना' सर्व घटनांसाठी RSS....; नाना पटोलेंचा गंभीर आरोप - Nagpur Congress Protest - NAGPUR CONGRESS PROTEST

Congress Protest In Nagpur : बदलापूर घटना आणि राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना याविरोधात आज (29 ऑगस्ट) नागपुरात महिला काँग्रेसच्या वतीनं 'नारी न्याय आंदोलन' करण्यात आलं. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली.

Nana Patole Serious Allegations On RSS over Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed and Badlapur case
नाना पटोले (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2024, 10:30 PM IST

नागपूर Congress Protest In Nagpur : महिला काँग्रेसच्या नेतृत्वात आज (29 ऑगस्ट) नागपुरात 'नारी न्याय आंदोलन' करण्यात आलं. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा, महासचिव मुकुल वासनिक, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी या आंदोलनात सहभागी झाले होते. सुमारे 5 तास आंदोलन केल्यानंतर अलका लांबा यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या महिलांनी काही काळ रस्ता रोखून धरला होता. मात्र, पोलिसांनी महिला आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

महिला काँग्रेस 'नारी न्याय आंदोलन' (ETV Bharat Reporter)

महामहिम तुम्ही घाबरू नका, आम्हाला धीर द्या : यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना अलका लांबा म्हणाल्या की, "राष्ट्रपती मुर्मू म्हणतात की त्या चिंतेत आहेत. ज्या देशाच्या राष्ट्रपती घाबरलेल्या असतील, त्या देशातील महिलांचं काय होणार? मुर्मू जी तुम्ही घाबरु नका, आपल्या पदाचा वापर करून सर्व महिलांना धीर द्या. आता खूप झालंय कोणी आमचं रक्षण करेन, याची आम्ही वाट पाहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही गेली दहा वर्ष गुन्हेगारांना वाचवण्याचं काम केलं. ब्रिजभूषण सिंहला कोणी वाचवल?", असा सवाल लांबा यांनी केला. तसंच महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झालंय. त्यामुळं राजकीय महिला आरक्षण लागू करावं, सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील 50 टक्के महिला आरक्षण लागू करावं, अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.

बदलापूरची शाळा आरएसएसच्या माणसाची : यावेळी आरएसएस आणि भाजपावर टीका करत नाना पटोले म्हणाले की, "बदलापूरच्या ज्या शाळेत मुलींवर अत्याचार झाला ती शाळा आपट्यांची होती. ती आरएसएसची शाळा होती. तिथून पुरावे नष्ट करण्यात आले, सीसीटीव्ही गायब केले गेलेत. भाजपाचा सरकारी भाडोत्री वकील उज्ज्वल निकम मुलींना झालेली इजा ही सायकल चालवताना झाली असं सांगून दिशाभूल करत आहे. मालवणमधील छत्रपतींची मूर्ती बनवणारा आपटेच होता. त्या माणसानं मूर्ती बनवताना अनेक चुका केल्या. महात्मा गांधींच्या हत्येतही आपटे होता", अशा शब्दात नाना पटोले गरजले.

महिलांना आरएसएसमध्ये दुय्यम स्थान : लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही यंदा महिलांना जास्त प्रमाणात उमेदवारी देण्यात येईल असं स्पष्ट आश्वासन नाना पटोले यांनी दिलंय. यावर बोलताना राष्ट्रीय काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महासचिव मुकुल वासनिक यांनी सूचना केल्या आहे. महिलांना सुरक्षित करण्यासाठी आपल्याला आपल्या विचारसरणीत बदल करावे लागतील. मात्र, मोदी सत्तेत असेपर्यंत तसं होऊच शकत नाही. यामागचं कारण म्हणजे पंतप्रधान मोदी हे आरएसएसमध्येच तयार झाले आहेत. तसंच महिला आरएसएसच्या सदस्य होऊ शकत नाही. त्यासाठी त्यांना राष्ट्र सेविका समितीत जावं लागतं. महिलांना आरएसएसमध्ये दुय्यम स्थान दिलं जात असल्याचंही ते म्हणाले. तसंच विधानसभा निवडणुकांसाठी पुरुष आणि महिलांची अर्ज निरपेक्ष पद्धतीनं तपासा. मी असं म्हणत नाही की महिलांना ग्रेस मार्क द्या, मात्र त्यांच्या कामाचा निरपेक्ष विचार करा. असं झालं तर मोठ्या संख्येनं महिलांना विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळू शकेल, असंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. "मुलींवर निर्बंध लादण्याऐवजी मुलांना शिकवण देण्याची गरज", मुंबई उच्च न्यायालयानं सुनावलं - Badlapur Case in High Court
  2. बदलापूर-मालवणमधील घटना महायुती सरकारला भारी पडू शकतात का? वाचा स्पेशल रिपोर्ट - Mahayuti government
  3. महाराष्ट्र बंद बेकायदा असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल, बंद मागे घेण्याचं शरद पवारांचं आवाहन - Bombay high court News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.