ETV Bharat / state

65 हजार रोपट्यांतून लिहिलं 'भारत माता'; विश्वविक्रमाची 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद - ताडोबा महोत्सव

Tadoba Festival : चंद्रपूर वनविभागातर्फे सध्या तीन दिवसीय "ताडोबा महोत्सवाचं" आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी वनविभागातर्फे रामबाग येथे 65 हजार 724 आणि 26 प्रजातीच्या रोपट्यांनं 'भारत माता' हे नाव साकारण्यात आलंय. याची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये करण्यात आली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना याचं प्रमाणपत्रही देण्यात आलं.

name 'Bharat Mata' written
भारत माता
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 7:59 PM IST

Updated : Mar 2, 2024, 10:25 PM IST

रोपट्यांच्या साहाय्यानं साकारलं भारत माता नाव

चंद्रपूर Tadoba Festival : ताडोबा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 2 मार्चला चंद्रपूर वनविभागानं आपलं नाव 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदवलं. वनविभागाच्यावतीनं रामबाग येथे 65 हजार 724 आणि 26 प्रजातीच्या रोपट्यांनी 'भारत माता' हे नाव साकारण्यात आलं. यावेळी वनमंत्री मुनगंटीवार यांना 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'चं प्रमाणपत्र देण्यात आलं.

हेलिकॉप्टरमधूनही बघता येणार 'ते' नाव : ताडोबा अभयारण्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर जावी यासाठी आज 'भारत माता' हे नाव 65 हजार 724 रोपट्यांच्या साहाय्यानं पूर्ण करण्यात आलं. याचा विश्वविक्रम साधण्यात आला. विमान आणि हेलिकॉप्टरमधून हे नाव वाचता येणार आहे. ताडोबा व्यतिरिक्त या नावाला देखील आकर्षण निर्माण व्हावं, हा यामागचा उद्देश होता. चंद्रपूर येथे सध्या पहिल्यांदाच ताडोबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवसीय या महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.

चंद्रपुरात अवतरल्या विश्वसुंदरी : 'मिस वर्ल्ड' स्पर्धेच्या संस्थापक ज्युलिया मॉर्ले यांच्यासह जगातील विविध देशातून आलेल्या विश्वसुंदरी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सौंदर्यवती चंद्रपुरात अवतरल्या आहेत. यावेळी त्यांना ताडोबाची सफर करवण्यात आली. त्यांना ताडोबाची भुरळ पडली. सन 2021 आणि 2022 मधील मिस इंडिया सिनी शेट्टी म्हणाल्या, "चंद्रपुरात येऊन आज अतिशय आनंद झाला. वाघांचं संरक्षण या प्रकल्पासाठी काम करण्याची संधी मिळाली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे." ऑस्ट्रेलियाच्या क्रिस्टिन लाइज यांनी 'सेव्ह द टायगर प्रोजेक्ट' ही अतिशय महत्त्वाची आणि तेवढीच सुंदर संकल्पना असल्याचं म्हटलं. इंग्लडच्या जेसिका म्हणाल्या की, "येथे येऊन स्वत:ला भाग्यशाली समजत आहे. या कार्यक्रमाचा आम्ही एक भाग बनू शकलो, याचा आनंद आहे." स्पेनच्या पोला यांनी सांगितलं की, "वाघ हे धैर्याचं आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. जैवविविधतेसाठी वाघ महत्त्वाचा घटक असून अशा उपक्रमातून पर्यावरणाचं संरक्षण होईल."

हेही वाचा:

  1. पोलिसांची मान शरमेने खाली, फौजदारच निघाला ड्रग्ज तस्कर; 45 कोटींच्या ड्रग्ससह अटक
  2. बारामती शहर विकासाचे रोल मॉडेल; २५ हजार युवांना मिळणार रोजगार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  3. कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक आरोप! भाजपाकडून काँग्रेस आमदारांना 50 कोटींची ऑफर दिल्याचा दावा

Last Updated : Mar 2, 2024, 10:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.