ETV Bharat / state

पानठेल्यावर सिगरेटचा धूर तोंडावर सोडल्यानं झालेल्या वादातून एकाची हत्या; उपराजधानीतील घटना - Nagpur Murder News

Nagpur Murder News : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पानठेल्यावर सिगारेटच्या धूर तोंडावर सोडल्यानं उद्भवलेल्या वादातून एकाचा खून केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीय.

Nagpur Crime
पानठेल्यावर सिगारेटच्या धूर तोंडावर सोडल्यानं झालेल्या वादातून एकाची हत्या; उपराजधानीतील घटना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 11:46 AM IST

नागपूर Nagpur Murder News : पानठेल्यावर सिगारेट ओढण्यासाठी आलेल्या एका महिलेनं तिथं उभ्या असलेल्या इसमाच्या तोंडावर धूर सोडल्यामुळं निर्माण झालेल्या वादाचं रुपांतर हत्येच्या घटनेत झालंय. ही घटना नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगरमध्ये घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे.

पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बाकडे सभागृह मागे रक्तानं माखलेल्या गंभीर जखमी अवस्थेत एक इसम पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून त्या इसमाला उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आरोपीनं या इसमावर धारदार शस्त्रानं वार केल्याचा खुलासा डॉक्टरांनी केल्यानंतर पोलिसांनी या अनुषंगानं तपास सुरु केला असता अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आलाय. रणजीत राठोड असं या मृत तरुणाचं नाव असल्याचं तपासात समोर आलंय.

सिगारेटचा धूर ठरला कारणीभूत : पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत रणजीत राठोड हे सिगरेट ओढण्यासाठी पानठेल्यावर गेले असताना त्याचं वेळी जयश्री पानझारे नामक महिला सिगरेट ओढण्यासाठी पानठेल्यावर आली. रणजीतनं रात्री उशिरा एका महिलेला सिगरेट ओढण्यासाठी पानठेल्यावर येताना पहिल्यांदा बघितल्यानं कुतूहलामुळं तो तिच्याकडे बघत होता. मात्र, ही बाब त्या जयश्रीला अजिबात आवडली नाही. तिनं सिगरेटचा धूर रणजीतच्या तोंडावर सोडत, "क्या देख रहा है?" असं खडसावून विचारलं. त्यानंतर रणजीतनंदेखील मोठ्या आवाजात तिला उत्तर दिल्यानं दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यावेळी जयश्रीची मैत्रीण सविता सायरे देखील तिथं उपस्थित होती. दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरु झाला होता.

मोबाईलवरील रेकॉर्डिंगमुळं आरोपी अटकेत : याचवेळी पानठेल्यावर आलेले काही जण दोघांकडे बघून हसायला लागले. त्यामुळं जयश्री पानझारे ही अधिकच चिडली. तिने लगेच तिच्या मित्राला फोन करुन तिथं बोलावलं. यादरम्यान रणजीत राठोड घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना रस्त्यात गाठून आरोपींनी त्यांच्या पोटात आणि छातीत चाकूनं वार करुन पळ काढला. जयश्री पानझारे आणि रणजीत यांचा वाद सुरु असताना त्यांनी मोबाईल मध्ये त्या महिलेचं व्हिडिओ शूटिंग केलं होतं. त्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी आरोपी आकाश दिनेश राऊत आणि सविता यशवंत सायरे यांना अटक केलीय. तर जयश्री दीपक पानझारेचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा :

  1. मैत्रिणीचं अपहरण करत मागितली खंडणी, पैसे मिळाल्यानंतरही खून करणाऱ्या तिघांना अटक - Pune Murder News
  2. पोलिसांना खबर न देताच बालकावर अंत्यसंस्कार, आईच्या संशयावरुन मृतदेह पुन्हा काढले बाहेर, नेमकं प्रकरण काय? - Jalna Crime News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.