ETV Bharat / state

"लव्ह ट्रँगल" प्रकरणातून एकाचा घात, दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक - Crime News

Crime News - नागपूर येथील भीमनगर येथे एका तरुणानं प्रेम प्रकरणामुळे दुसऱ्या तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. मृतक तरुण एका तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. तरुणीनं नकार दिला असता मृतक तरुण त्या तरुणीला चिडवू लागला. त्यामुळे तरुणीच्या प्रियकरानं तरुणाचा खून केला.

Love Triangle Murder Case
एकतर्फी प्रेम प्रकरणातून खून (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 12:07 PM IST

नागपूर Crime News : नागपूर शहाराजवळील हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीतील भीमनगर येथे खळबळजनक घटना घडली. एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बादल भाऊराव निंबर्ते असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. बादलच्या हत्या प्रकरणात राज अनिल पाटील, गंगा अजय पांडे यांसह दोन अल्पवयीन बालक सहभागी आहेत. मृतक बादल आणि आरोपी राज पाटील हे दोघेही एकाचं मुलीवर प्रेम करायचे. मात्र, त्या तरुणीनं बादलला नकार दिला होता. त्यामुळे बादल येता-जाता तरुणीला चिडवायचा. या कारणामुळे चिडलेल्या राजने मित्रांच्या मदतीने बादलची हत्या केली असल्याचे तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोन अल्पवयीनांना अटक केली आहे तर एक आरोपी मोकाट आहे.

दोघेही एकाच तरुणीच्या प्रेमात : याप्रकरणातील मुख्य आरोपी राज पाटील याचे भीमनगरमध्येचं राहणाऱ्या एका तरुणी सोबत प्रेम संबंध होते. तर मृतक बादल सुद्धा त्याच तरुणीला पसंत करायचा. बादल त्या तरुणीवर एकतर्फी प्रेम करीत होता. काही महिन्यांपूर्वी बादलने त्या तरुणीला प्रपोज केलं असता तिनं त्याला नकार दिला. त्यानंतर बादल हा तरुणीला येता-जाता चिडवत असायचा. तसंच आरोपीला देखील त्या मुलीबद्दल वाईटसाईट सांगायचा. त्यामुळे नेहमी राज आणि बादल त्यांच्यात वाद होत असे. याच गोष्टींचा राग मनात धरून आरोपी राज याने गंगा पांडे आणि दोन अल्पवयीन मित्रांसह बादलच्या हत्येचा कट रचला.

कट रचून केली हत्या : मृतक बादल घरी असताना आरोपींनी त्याला भीमनगर झोपडपट्टीच्या मागील अंगणवाडी जवळ बोलावले. तिथे आल्याबरोबर चारही आरोपींनी धारदार शस्त्र आणि लोखंडी रॉडने वार करून बादलला जागीचं ठार केलं. बादलला मारहाण सुरू असताना एक मित्र घटनास्थळी आला. आरोपी त्याच्याही मागे मारायला धावले म्हणून तो पळून गेला. आजूबाजूला असलेले काही लोक घटनास्थळी गोळा झाले. तेव्हा आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल : भीमनगर भागात राहणाऱ्या नागरिकांनी लगेच घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर लगेच एमआयडीसीचे ठाणेदार प्रवीण काळे, एपीआय योगेश मोहिते, संजय बनसोड यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अवघ्या काही तासात मुख्य आरोपी राज पाटील याला अटक केली आणि दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं. आरोपी गंगा पांडे हा अद्याप फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.

हेही वाचा

  1. एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला; घराच एकटी असताना केला वार
  2. Youth Murder Case Nanded: मेहुणीच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून प्रियकराची निर्घृण हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.