नागपूर Nagpur Crime : एका खासगी शाळेत शिकवण्याऱ्या कला शिक्षकानं दाखलेल्या कलेमुळं आज त्याची रवानगी थेट पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. मंगेश विनायक खापरे असं या शिक्षकाचं नाव आहे. स्वच्छतागृहाच्या खिडकीतून गुपचूप तो महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करत होता, असा त्याच्यावर काही महिलांनी आरोप केला होता. महिलांच्या या आरोपावरुन अंबाझरी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
तीन दिवसीय खासदार औद्योगिक महोत्सवात गर्दी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मैदानावर तीन दिवसीय खासदार महोत्सव ( अॅडव्हांटेज विदर्भ इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस & इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह ) आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये देशातील आणि परदेशातील अनेक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी नागपूरसह शेजारील परिसरातून या महोत्सवाला मोठी गर्दी जमली होती.
अशी उघडकीस आली घटना : महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 29 जानेवारीला सायंकाळी दोन महिला प्रसाधनगृहात गेलेल्या असताना त्यांना कुणीतरी लपून व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहे, असं भासलं. त्यांनी खिडकीच्या मागं जाऊन बघितलं असता, त्या ठिकाणी कुणीही नसल्यानं कदाचित आपल्याला भास झाला असावा, असा अंदाज लावून तिथून पुढं निघाल्या. मात्र, ही बाब त्यांनी आयोजकांच्या कानावर टाकली. काही वेळानंतर परत दोन महिलांनी ही अश्याच प्रकारची तक्रार दिल्यानंतर आयोजकांनी मात्र, प्रकरणाचं गांभीर्य ओळखून परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीचं फुटेज तपासलं. तेव्हा त्यात मंगेश खापरे तिथून पळून जाताना दिसला. त्यानंतर आयोजकांनी या संदर्भात अंबाझरी पोलिसांना माहिती देऊन तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी मंगेश खापरेला अटक केली आहे.
पदाची गरिमा केली मातीमोल : मंगेश विनायक खापरे हा नागपूरच्या एका खासगी शाळेत कला शिक्षक म्हणून काम करतो. मात्र, त्यानं केलेल्या विकृत कृत्यामुळं पदाची गरिमा मातीमोल मिसळली आहे.
शिक्षकाची विकृत मानसिकता : मंगेश खापरे याला गेटचे डिझाईन करण्यासाठी ठेकेदारानं नेमलं होतं. गेल्या 8 दिवसांपासून तो तिथं काम करत होता. दरम्यान या काळात त्यानं त्याच्या मोबाइलमध्ये अनेक महिलांचे व्हिडिओ काढले आहेत, असा दावा करण्यात येत आहे. अंबाझरी पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त करत कारवाईला सुरुवात केली आहे.
हेही वाचा :