ETV Bharat / state

'पैलवान ते केंद्रात मंत्री', खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्याच टर्ममध्ये मंत्रीपद कसं मिळवलं? - Murlidhar Mohol

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 2:02 PM IST

Murlidhar Mohol : पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. त्यांच्या राजकीय प्रवासावर एक नजर टाकूया...

Murlidhar Mohol
Murlidhar Mohol (ETV Bharat)

पुणे Murlidhar Mohol : देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून आज नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तीस खासदारही मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. राज्यातील अनेक खासदारांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची चर्चा आहे. यात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनादेखील मंत्रिपदासाठी फोन आला असून तेदेखील आज शपथ घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते पुण्याचा खासदार आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान असा मुरलीधर मोहोळ यांचा प्रवास राहिलाय.

शिक्षणासोबत कुस्तीचे देखील घेतले धडे : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्‍यातील मुठा गावात मुरलीधर मोहोळ यांचा 4 नोव्हेंबर 1974 रोजी जन्म झाला. वडील किसनराव मोहोळ यांचे कुटुंब नोकरी आणि मुलांच्या शिक्षणासाठी 1985 च्या दरम्यान सुमाराला पुण्यातील कोथरुडमध्ये आले. त्यांनी पुण्यातील भावे स्कूलमध्ये मोहोळ यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. मुळशी तालुक्याची पार्श्वभूमी पाहिली तर तिथं घराघरात पैलवानकी पाहायला मिळत असते. मोहोळ कुटुंबालादेखील याच पहिलवानकीची पार्श्‍वभूमी असल्यानं त्यांनी शिक्षणासोबत कुस्तीचेदेखील धडे घेतले. पुण्यातील खालकर आणि निंबाळकर तालमीमध्ये कुस्तीचे धडे घेतल्यावर मोहोळ हे कोल्हापुरला गेले. तिथेच पदवीपर्यंतचं (कला शाखा) शिक्षण शिवाजी विद्यापीठात घेतलं. कुस्तीत त्यांनी आंतरमहाविद्यालयीन आणि राष्ट्रीय स्तरावरच्या आखाड्यापर्यंत मजल मारली. त्यानंतर कॉलेज संपवून ते 1996 च्या दरम्यान पुण्यात परत आले. पुण्यात आल्यावर कुस्तीचे धडे सोडून ते 'राजकीय कुस्ती'कडे वळले.

असा सुरू झाला राजकीय प्रवास : भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांंचं राजकारण पाहून मुरलीधर मोहोळही राजकारणात उतरले. पुण्यात माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या संपर्कात येऊन त्यांनी सुरुवातीला वॉर्ड पातळीवर काम सुरू केलं. लग्नानंतर 2002 साली मोहोळ यांना शिक्षण मंडळाचं सदस्य पद मिळालं. 2006 मध्ये केळेवाडी प्रभाग येथे पोटनिवडणूक जाहीर झाली. तेव्हा पोटनिवडणूक लढण्याची संधी भाजपनं मोहोळ यांना दिली. ही निवडणूक मुरलधीर मोहोळ यांनी जिंकली. 2007 मधील महापालिकेच्या सर्वसाधारण निवडणुकीत ते पुन्हा याच भागातून नगरसेवक झाले. पुढे 2009 मध्ये खडकवासला येथून विधानसभा निवडणूक लढवण्याचे आदेश पक्षानं दिले. तेव्हा मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्याविरोधात त्यांनी ही निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

2019 मध्ये मिळालं महापौर पद : पुणे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मोहोळ तिसऱ्यांदा नगरसेवक झाले. महापालिकेत तेव्हा भाजपची सत्ता स्वबळावर आली. मोहोळ यांना पहिल्याच वर्षी स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळालं. महापालिकेत काम करत असताना मोहोळ यांनी तेव्हा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या बड्या नेत्यांची मनं जिंकली. 2019 मध्ये त्यांना महापौर पद देण्यात आलं. महापौर पद असताना मोहोळ हे कोथरूड विधानसभामधून तयारी देखील करत होते. पण पक्षानं तेव्हा चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. मोहोळ यांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. पण असं असतानाही पक्षाची जबाबदारी मोहोळ यांच्यावर वाढू लागली. ते राज्याचे सरचिटणीस झाले. 2024 साली त्यांना खासदारकीची तिकीट देत त्यांनी पुण्याचं गड राखून पक्षाला विजय मिळवून दिला.

मुरलीधर मोहोळांची राजकीय कारकीर्द...

  • पुणे महानगरपालिकेत 2002, 2007, 2012 आणि 2017 साली नगरसेवक
  • 2009 मध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवार
  • पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष 2017-2018
  • 2019- 2022 मध्ये पुणे महानगर पालिकेचे महापौर
  • 2024 पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार

हेही वाचा

  1. "बुलढाण्याला प्रतापराव जाधवांच्या रूपानं तिसर्‍यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळणार", संजय गायकवाड यांचा दावा - PRATAPRAO JADHAV News
  2. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचं 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांना निमंत्रण नाही - PM Modi swearing ceremony
  3. मोदी 3.0 मध्ये राज्यातील कोणत्या खासदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी, वाचा संभाव्य यादी - Cabinate Ministers

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.