सातारा Youth Father Murder Case : सुनेला पळवून नेल्याच्या रागातून विवाहितेच्या सासऱ्याने तरुणाच्या वडिलांची चाकूने वार करून (Murder of father) हत्या केली. यानंतर मृताची आई आणि भावावर खुनी हल्ला चढवल्याची खळबळजनक घटना बुधवारी (१४ मार्च) रात्री कराड तालुक्यातील सैदापूर गावात घडली आहे. या घटनेत या तरुणाचे वडील (रा. तडवळे, ता. खटाव, जि. सातारा) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संशयित सासऱ्याला (रा. सैदापूर, ता. कराड) कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे.
धमकी देत मुलाच्या वडिलांचा खून : कराड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैदापूर (ता. कराड) येथील संतोष देसाई यांच्या अंबक वस्तीवर गुऱ्हाळ आहे. त्यांच्या गुऱ्हाळावर पती पत्नी तसंच दोन मुले असे चौघेजण ऊसतोड कामगार म्हणून काम करत होते. बुधवारी (दि. 13) रात्री ९ च्या सुमारास संशयित खून करणारा सासरा हा मोटरसायकलवरून सून पळवून (daughter in law) नेणाऱ्यांच्या घरी आला. आपल्या सुनेला तुमच्या मुलानं पळवून नेलं आहे. तुम्हाला मस्ती आली आहे. आता तुम्हाला कोणालाच जिवंत सोडणार नाही. संपवून टाकतो, असं म्हणून खिशातील चाकू काढला आणि सुनेला पळवून नेणाऱ्या तरुणाच्या वडिलांच्या छातीवर तीन वार करून तसंच चाकू भोकसून त्यांची हत्या केली.
आई आणि मुलाच्याही खुनाचा प्रयत्न : वडिलांची हत्या केल्यानंतर संशयिताने तरुणाची आई तसंच त्या तरुणाच्या भावावरही चाकूचे वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, या थरारक घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, श्रीसुंदर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, उपनिरीक्षक शेख, डिसले हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयिताला तत्काळ ताब्यात घेतलं. अजित मदने (वय २२) याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित विजय धर्मा जाधव याला अटक केली. पोलीस निरीक्षक श्रीसुंदर या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
हेही वाचा :
- Pollution In Indrayani River : देहूतील पवित्र इंद्रायणीत पुन्हा शेकडो मासे मृत: किनाऱ्यावर मेलेल्या माशांचा खच
- Pune ISIS Terror Module Case : पुणे इसीस मोड्युल प्रकरण ; साताऱ्यात दहशतवाद्यांकडून लूट, घेतलं बॉम्ब बनवण्याचं सामान
- One Nation One Election : देशात 'एक देश एक निवडणूक' लागू करण्याची शिफारस; कोविंद समितीचा राष्ट्रपतींना अहवाल सादर