पिंपरी चिंचवड (पुणे) Murder in Pimpri chinchawad : येथील देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विकास नगर येथे काल (5 मार्च) रात्री एकच्या सुमारास विशाल विजय थोरी नावाच्या मुलास त्याच भागातील चार ते पाच मुलांनी मारहाण करून जीवे मारले. या घटनेमधील चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलय. मृत युवक हा ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाचा मुलगा आहे.
चार संशयित ताब्यात : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत देहूरोड पोलीस ठाणे हद्दीत ५ मार्च २०२४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास साई दर्शन सोसायटी समोर विशाल विजय थोरी या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यात आरोपींनी मृतकाच्या डोक्यात कुंडी, बांबूचे दांडके आणि सिमेंटचा गट्टू घालून खून केला. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी विशालच्या हत्येप्रकरणी ४ संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल पुढील तपास पोलीस करीत आहेत.
हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याचा संशय : विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आला. ही घटना पूर्व वैमनस्यातून झाली असल्याचा संशय देहूरोड पोलिसांनी व्यक्त केला आहे.
फटाके फोडण्याच्या वादातून हत्या : नाशिक परिसरात फटाके फोडण्याच्या वादातून एका युवकाची धारदार शस्त्रानं हत्या केल्याची घटना 12 नोव्हेंबर, 2023 रोजी घडली होती. खूनाची अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी गावात ऐन दिवाळीत (Diwali 2023) घडली होती. यामध्ये फटाके फोडण्याच्या वादातून एका 28 वर्षीय तरुणाची हत्या केल्याचं उघडकीस आलं होतं. या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. मिळालेली माहिती अशी की, गौरव तुकाराम आखाडे (वय 30, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) असं हत्या झालेल्या युवकाचं नाव होतं.
धारदार शस्त्रानं सपासप वार : रविवार 12 तारखेला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाथर्डी गावातील स्वराज्य नगर येथे मयत गौरवच्या घराबाहेर त्याच्या शेजारी राहणारे शिंदे कुटुंबीय फटाके फोडत होते. यावेळी आखाडे याने लहान मुले दचकतात म्हणून फटाके मैदानात फोडण्यास सांगितलं. मात्र, त्यावेळी काही युवकांशी फटाके फोडण्यावरून वाद झाला. यानंतर काल त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. त्यानंतर शिंदे कुटुंबीयातील काहींनी रागाच्या भरात आखाडे याच्यावर धारदार शस्त्रानं वार केल्यानं त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं होतं. तर दोघेजण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत होते.
हेही वाचा: