ETV Bharat / state

मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी; वादळी वाऱ्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर - Mumbai Train Update - MUMBAI TRAIN UPDATE

Mumbai Train Update : मुंबईमध्ये आज दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने (Mumbai Rain) अवघ्या मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली. यामुळं मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलची वाहतूक विस्कळीत झालीय.आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबल्यामुळं प्रवासी संतप्त झाले होते.

Mumbai Train Update
वादळी वाऱ्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर (ETV BHARAT)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 11:00 PM IST

मुंबई Mumbai Train Update : मागील चार-पाच दिवसापासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी (Mumbai Rain) लावली आहे. आज मुंबईत दुपारनंतर अचानक सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळं मुंबईकरांची तारांबळ उडाली, तर मुंबईच्या रेल्वे वाहतूकीवर देखील याचा मोठा परिणाम झाला.

रेल्वेला झाला 30 ते 40 मिनिटे झाला उशिर : सोमवारी सकाळी ठाणे रेल्वे स्थानक इथे काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती. यानंतर दुपारनंतर आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने आणि पावसामुळं मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला. यावेळी रेल्वे गाड्या 30 ते 40 मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली.

रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी : संध्याकाळची वेळ असल्यामुळं चाकरमान्यांना घरी जाण्याची लगबग असते. परंतु घरी जाण्याच्या वेळेलाच गाड्या उशिरा धावत असल्यामुळं रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी या मुख्य स्थानकावर देखील प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या ठिकाणी रेल्वे पोलीस सुरक्षा ही वाढवण्यात आली होती. तसेच गर्दीमुळं रेल्वेतून प्रवासी लटकून प्रवास करत होते.

घाटकोपरमध्ये बॅनर कोसळला : दुपानंतर दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई तसंच पश्चिम उपनगरामध्ये अचानक सोसाट्याचा वादळीवारं आल्यानं सर्वांचीच धावपळ उडाली. याच दरम्यान मुंबईतील घाटकोपर इथं एक भला मोठा होर्डिंग कोसळला. या होर्डिंग्स खाली अनेक मुंबईकर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा होर्डिंग पेट्रोल पंपच्या बाजूला कोसळल्यामुळं या होर्डिंगच्या खाली काही मुंबईकर गंभीर जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. तसंच या होर्डिंग खाली 90 ते 100 वाहनं अडकली असून यामुळं 35 जण जखमी असल्याची माहिती मिळतेय.

हेही वाचा -

  1. मुंबईत वादळी वाऱ्यामुळं दोन दुर्घटना; पेट्रोलपंपावर होर्डिंग्स कोसळल्यानं अनेक वाहनं दबली तर सुमारे 35 जण जखमी - Heavy Rain in Mumabi
  2. अवकाळी पाऊस, धुळीच्या वादळानं 'मायानगरी' आणि ठाण्यात हाहाकार, भर दुपारी दाटला अंधार; नागरिकांची तारांबळ - Rain in Mumbai
  3. राज्यातील निवडणुकीच्या आखाड्यावर पावसाचे काळे ढग; जाणून घ्या, तुमच्या जिल्ह्याचा पावसाचा अंदाज - Weather Update

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.