ETV Bharat / state

दोन ट्रकमधून 80 लाखांचा गुटखा जप्त, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai Police Seized Gutkha : मुंबई पोलिसांनी 1 फेब्रुवारीच्या रात्री मोठी कारवाई करत दोन ट्रकमधून तब्बल 87 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या प्रकरणी दोन्ही ट्रक चालकांना अटक करण्यात आली आहे.

Mumbai Police Seized Gutkha
Mumbai Police Seized Gutkha
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 7:00 AM IST

मुंबई Mumbai Police Seized Gutkha : मुंबईच्या गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 फेब्रुवारीच्या रात्री नाकाबंदी दरम्यान पोलिसांना दोन संशयास्पद ट्रक आढळून आले. या ट्रकची कसून तपासणी केली असता त्यात तब्बल 87 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला आढळून आला. गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन होनवडजकर यांनी ही माहिती दिली आहे.

दोन जणांना अटक : नाकाबंदीसाठी तैनात पोलिसांना दोन आयशर ट्रक संशयास्पद वाटले. त्यानंतर त्यांनी त्या ट्रकची कसून तपासणी केली. या ट्रकमधून 87 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात कलम 328, 188, 272, 273 आणि 34 तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांना अटकही करण्यात आली आहे. माजीद इदरीश खान आणि सुबीन हाकम खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपी ट्रक चालकांची नावं आहेत. हे दोघेही राजस्थानचे निवासी आहेत.

1 करोड 70 लाख रुपयांची मालमत्ता जप्त : हे दोन ट्रक आणि प्रतिबंधित गुटखा, अशी एकूण 1 करोड 70 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अरुण भोसले यांनी दिली. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त हेमराज सिंह राजपूत, पोलीस आयुक्त जगदेव कालापाड, गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन होनवडजकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खवणेकर, पोलीस हवालदार नायकवडी, पोलीस शिपाई पोटे, दराडे, राऊत आणि महिला पोलीस शिपाई रुपनर यांनी केली आहे.

हे वाचलंत का :

  1. राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; एक कोटीचा अवैध मद्यसाठा जप्त
  2. मुंबई पोलिसांनी कुख्यात ड्रग्ज तस्करांना ठोकल्या बेड्या, 11 तस्कराकडून 2 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त
  3. लाकडाचा भुसा आणि केमिकल मिश्रणापासून तयार केलेला सात लाखांचा बनावट जिरेसाठा जप्त, दोघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.