ETV Bharat / state

बृहन्मुंबई महानगरपालिका अ‍ॅक्शन मोडवर! रस्त्यांवर विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची होणार तपासणी - Mumbai Street Food inspection

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 17, 2024, 4:03 PM IST

Mumbai Street Food inspection : मुंबईत रस्त्यांवर विकले जाणारे अन्नपदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असल्यानं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानद प्राधिकरणाकडून मुंबईत अन्न सुरक्षा चाचणी करण्यासाठी लवकरच 'मोबाईल फूड टेस्टिंग व्हॅन' तैनात करण्यात येणार आहे.

Brihanmumbai Municipal Corporation
मुंबई महानगरपालिका (Source - Etv Bharat)

मुंबई Mumbai Street Food inspection : एक काळ असाही होता जेव्हा रस्त्यांवर विकले जाणारे खाद्यपदार्थ खाणं कमी दर्जाचं मानलं जातं होतं. मात्र, आता फूड ब्लॉगर्सच्या जमान्यात अनेक स्ट्रीट फूडधारक चर्चेत आले आहेत. फूड ब्लॉगर्समुळे अनेकांचा व्यवसाय चांगला चालत आहे. मात्र, या सर्वच ठिकाणी विकले जाणारे खाद्यपदार्थ हे चांगले असतातच असं नाही. रस्त्यांवर विकले जाणारे खाद्यपदार्थ खाल्ल्यानं बाधा झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत. मात्र, केवळ एखादा ब्लॉगर सांगतोय म्हणून तुम्ही देखील एखाद्या ठेल्यावर जाऊन खात असाल तर, ही बातमी काळजीपूर्वक वाचा.

रस्त्यांवर मिळणारे खाद्यपदार्थ कितपत सुरक्षित : मुंबईत विविध खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध अनेक फूड जॉइन्टस् आहेत. यात मुंबईतील जुहू चौपाटी, मोहम्मद अली रोड, गिरगाव चौपाटी, भुलेश्वर, चर्चगेट, अंधेरी, घाटकोपर परिसरातल्या खाऊगल्ल्यांची नावं आवर्जून घ्यावी लागतील. या खाऊगल्ल्यांचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर फूड ब्लॉगरच्या माध्यमातून पाहिले असतील. सोशल मीडियावरचे व्हिडिओ पाहून अनेक खवय्ये रस्त्यांवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याकडे वळत आहेत. मात्र, मुंबईत सर्वच ठिकाणी मिळणारे खाद्यपदार्थ हे जरी चविष्ट असले तरी आपल्या आरोग्यासाठी ते कितपत सुरक्षित आहेत, हे आपण तपासत नाही.

'मोबाईल फूड टेस्टिंग व्हॅन' तैनात केली जाणार : काही दिवसांपूर्वीच आईस्क्रीममध्ये मानवी अंगठा मिळाल्याची घटना असेल किंवा तळणीच्या झाऱ्याने गटारातील गाळ साफ करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ असेल, मुंबईतील असे अनेक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. आता या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण व बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्तपणे तपासणी अभियान राबवणार आहे. या संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात एक बैठक देखील घेण्यात आली. या बैठकीला पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी व एफएसएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमला वर्धन राव हे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुंबईतील रस्त्यांवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी लवकरच 'मोबाईल फूड टेस्टिंग व्हॅन' तैनात केली जाणार असल्याचा निर्णय देखील झाल्याची माहिती पालिकेनं दिली आहे.

महत्त्वाच्या सणांपूर्वी अन्नपदार्थांची होणार तपासणी : बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल फूड टेस्टिंग व्हॅन ऑन द स्पॉट भेसळ तपासणी मोहीमेसाठी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करण्यात येणार असून, ही सर्व तपासणी पथकं अन्नपदार्थांची प्रभावी अन्नसुरक्षा तपासणी करतील. हा उपक्रम दिवाळी, दसरा, गणपती या महत्त्वाच्या सणांपूर्वी केल्या जाणाऱ्या निगराणीचा एक भाग आहे. खवय्ये ताव मारत असलेले खाद्यपदार्थ आरोग्याला हानिकारक नसल्याची, थोडक्यात खाण्यायोग्य असल्याची खात्री या विशेष मोहिमेतून केली जाणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

भेसळीची तपासणी : मुंबईत विकले जाणारे सर्वच खाद्यपदार्थ हे स्वच्छ आणि शुद्ध असतातच असं नाही. अनेकदा या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ असते. या पार्श्वभूमीवर पालिकेत झालेल्या बैठकीत एफएसएसआयच्या खाद्यपदार्थ हाताळणाऱ्यांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा विस्तार करून आणि शहरात ऑन द स्पॉट जलद भेसळ चाचणीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणांवर चर्चा झाल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. "रस्त्यांवर विकले जाणारे अन्नपदार्थ आपल्या आरोग्यासाठी सुरक्षिन नसून त्या पदार्थांमुळे अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या फूड सेफ्टी ऑन व्हील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतिरिक्त मोबाईल फूड टेस्टिंग व्हॅन मुंबईत तैनात करण्यात येणार" असल्याचं एफएसएसआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राव यांनी म्हटलं आहे.

फूड ब्लॉगरची प्रतिक्रिया : या संदर्भात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व फुड ब्लॉगर रिंकी खाडे यांच्याशी ईटीव्हीने संपर्क साधला. निरनिराळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ चाखण्याची आवड असलेल्या खवय्यांना फूड ब्लॉगर्स एखाद्या फूड जॉइन्टची वाट दाखवतात, हे रिंकी यांना मान्य आहेच. "लोक अनेकदा व्हिडिओ पाहून एखाद्या फूड स्टॉलला भेट देतात. या लोकांच्या प्रतिक्रिया देखील आमच्यापर्यंत पोहोचतात. मात्र, एखाद्या फूड ब्लॉगरचा व्हिडिओ पाहून रस्त्यांवरील खाद्यपदार्थ खाताना सर्वप्रथम तिथली स्वच्छता आणि हायजिन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन लोकांनी रस्त्यांवरील खाद्यपदार्थ खावेत." असा दक्षतेचा इशारा रिंकी खाडे लोकांना देतात.

हेही वाचा

  1. बहिणींनो राखी बांधायला जायचं! मग बघा मुंबई लोकलचं वेळापत्रक, 'या' मार्गावर आहे मेगॉब्लॉक - Mumbai Mega Block
  2. मुंबई विमानतळाच्या सुरक्षेत मोठी चूक; विमानात लोड होत असलेल्या केमिकलला लागली आग - Mumbai Airport Fire
  3. वांद्राच्या शासकीय वसाहतीतील रहिवाशांना मिळणार 'भूखंड' - Government Estates in Bandra

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.