मुंबई Railway Mega Block : रविवारी मुंबईतील चाकरमान्यांचा आठवड्यातील सुट्टीचा दिवस असतो. परंतु, या सुट्टीच्या दिवशी विरंगुळा म्हणून अनेक मुंबईकर घराबाहेर पडतात. पण रविवारी (28-07-2024) मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबईकरांनो जर तुम्ही रविवारी घराबाहेर पडणार असाल तर रेल्वेचं खालील वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडा. नाहीतर मध्येच प्रवसात अडकण्याची शक्यता आहे.
मेगा ब्लॉक कुठे : मध्य रेल्वेच्या देखभालीच्या कामासाठी आणि विविध अभियांत्रिकी कामासाठी रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक सकाळी 11.05 पासून दुपारी 3 वाजून 5 मिनिटापर्यंत घेण्यात येणार आहे. माटुंगा स्थानक ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, सीएसएमटी येथून सकाळी 10.25 ते दुपारी 2.45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या या डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसंच यादरम्यान निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे गाड्या उशिरा पोहोचतील अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.
हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक कुठे? : दुसरीकडं हार्बर मार्गावर देखील मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकनंतर सायंकाळी सीएसएमटीसाठी पनवेल येथून पहिली लोकल 4.10 वाजता सुटेल. तसंच ट्रान्स-हार्बर मार्गावरसुद्धा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 9.39 ते 4.00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. दरम्यान, मेगाब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशीदरम्यान काही विशेष लोकल असतील, असं रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे.
हेही वाचा -
- मध्य रेल्वेचा आज मेगाब्लॉक; 'या' मार्गावर होणार परिणाम - Mumbai Local Mega Block News
- प्रवाशांनो लक्ष द्या...; रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगा ब्लॉक, पाहा वेळापत्रक - Mumbai Railway Mega Block
- मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा! - Mumbai Mega Block