ETV Bharat / state

मुंबईत रविवारी रेल्वेनं प्रवास करणार असाल तर 'हे' वेळापत्रक नक्की वाचा - Mega Block Updates - MEGA BLOCK UPDATES

Mumbai Local Mega Block Updates : मुंबईकरासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रविवारी मध्य रेल्व आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. जाणून घ्या गाड्यांचं सविस्तर वेळापत्रक.

Mega Block
मुंबईत मेगा ब्लॉक (Maharashtra Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 9:02 PM IST

मुंबई Mumbai Local Mega Block Updates : रविवारी मुंबईकरांना सुट्टी असल्यानं ते बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखतात. मात्र, जर रविवारी रेल्वेनं प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, रविवारी मध्य रेल्व आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे ब्लॉक कसा असणार? : मध्य रेल्वेवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद गाड्या बंद असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा, माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यावर थांबून डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचणार आहे. तसेच ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल, मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यावर थांबेल आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि स्थानकावर १५ मिनिटांनी पोहचणार आहे.

शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल : डाऊन जलद मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ३.३९ वाजता सुटेल. अप जलद मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची अंबरनाथ लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११.१० वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतरची पहिली आसनगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०४.४४ वाजता पोहोचेल.

हार्बर मार्ग मेगा ब्लॉक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोडवरून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत बंद राहतील.

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही : पनवेल/बेलापूर/वाशी येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी गोरेगाव/वांद्रेहून सुटणारी अप हार्बर लाईन सेवा सकाळी १०.४५ ते ५.१३ वाजेपर्यंत बंद राहतील. ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०४ वाजता सुटेल. तर गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२२ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ०४.५१ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४.५६ वाजता वांद्रेसाठी सुटेल.

विशेष सेवा : ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान, विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. हा मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळं होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याच आवाहन रेल्वेनं केलंय.

हेही वाचा -

  1. काँग्रेसचा मोठा मासा भाजपाच्या गळाला; अरविंदर सिंह लवलींच्या हातात 'कमळ' - Arvinder Singh Lovely joins BJP
  2. प्रसिद्ध गायकाची निवडणुकीत 'एन्ट्री'; ईशान्य मुंबईत होणार तिरंगी लढत - lok sabha election 2024
  3. मित्र असावा तर असा! निवडणुकीत मित्राचा विजय व्हावा म्हणून पठ्ठ्याचा बार्शी ते पुणे सायकलीवर प्रवास - Lok Sabha Election

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.