मुंबई Fact Check Unit : केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान अधिनियम दुरुस्ती 2021 याला भारतातील प्रख्यात हास्य विनोदी कलाकार कुणाल कामरा, एडिटर ऑफ गिल्ड इंडिया, असोसिएशन ऑफ मॅक्झिन इंडिया यांनी आव्हान दिलेलं आहे. (Attack on Freedom of Expression) भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या मुलभूत हक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम 19 याचा भंग या अधिनियमातील दुरुस्तीमुळे होतो, असं म्हणत त्यांनी ही दुरुस्ती नाकारण्यासाठी उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केलेली होती. या खटल्याच्या संदर्भात आज मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय यांनी निर्णय दिला की, ''या खटल्याच्या निमित्तानं दोन न्यायाधीशांचे परस्पर विरोधी निकाल आलेले आहेत. त्यामुळे तिसरे वरिष्ठ न्यायाधीश ए. एस. चांदुरकर हे या अधिनियमाच्या अंतर्गत केंद्र शासनाच्या फॅक्ट चेक युनिट बाबत अधिसूचनेला स्थगिती द्यायची किंवा नाही ते ठरवतील. त्यानंतर हा खटला पुन्हा न्यायाधीश गौतम पटेल, न्यायाधीश नीला गोखले या द्विसदस्यीय खंडपीठांसमोर जाईल."
खटल्यातील केंद्र शासनाची बाजू : या खटल्याच्या संदर्भात मध्यवर्ती बाजू फॅक्ट चेक युनिट बाबत होती. फॅक्ट चेक युनिट सोशल मीडियावर कोणत्याही माहितीवर पाळत ठेवणार आणि त्याची सत्य, असत्यता तपासणार. त्या संदर्भात भारत सरकारचं म्हणणं असं आहे की, "भारत भूमीत खोटी आणि खरी माहिती ओळखली गेली पाहिजे. त्यामुळे बनावट आणि खोटी माहिती जनतेमध्ये पसरणार नाही. उलट सत्य माहिती जनतेमध्ये जाईल. याची काळजी हे फॅक्ट चेक युनिट निश्चित करेल आणि लोकशाही त्यामुळे बळकट होईल." ही बाजू भारत सरकारचे अॅटर्नी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडली होती.
आव्हान देणाऱ्यांची बाजू: आव्हान देणाऱ्या तीन याचिकाकर्त्यांच्या वतीनं ज्येष्ठ वकिलांची फळी होती. त्यापैकी सर्वांत ज्येष्ठ वकील नवरोज सेरवाई यांचं म्हणणं होतं की, "कोणतीही माहिती सोशल मीडियावर किंवा प्रसार माध्यमात प्रसारित झाल्यावर ही खरी आहे किंवा खोटी हे केंद्र शासनाचं फॅक्ट चेक युनिट निश्चित करेल. भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रसारमाध्यमात आकडेवारी आधारे सोदाहरण टीका केली. तर फॅक्ट चेक युनिट ती खोटी आहे कोणत्या आधारावर ठरवणार? शासनाचं युनिट मनमानी पद्धतीनं सत्य असत्य ठरवू शकतील. म्हणून ते नाकारावं." आता तिसरे न्यायाधीश चांदुरकर ज्या न्यायाधीशांच्या बाजूनं निकाल देतील त्यावरूनच केंद्र शासनाच्या अधिसूचनेला स्थगिती दिली जाईल किंवा अधिसूचना जारी केली जाईल.
हेही वाचा: