ETV Bharat / state

तरुणीचे मॉर्फ फोटो नराधमानं सोशल मीडियावर केले व्हायरल; पीडितेनं दिला बेदम चोप - Mumbai Girl Beaten To Youth - MUMBAI GIRL BEATEN TO YOUTH

Mumbai Girl Beaten To Youth : सोशल माध्यमांवर ओळख झालेल्या नराधमानं तरुणीचे फोटो मॉर्फ करुन ते व्हायरल केले. यामुळे संतापलेल्या तरुमीनं या नराधमाला बेदम चोप दिला. तरुणीचे फोटो सोशल माध्यमात शेयर करणाऱ्या या नराधमावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Mumbai Girl Beaten To Youth
प्रतिकात्मक छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 11:25 AM IST

मुंबई Mumbai Girl Beaten To Youth : तरुणीचे फोटो मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या नराधमाला पीडितेनं बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केलं. राहुल रमेश पुरोहीत (वय 24) असं आरोपी नराधमाचं नाव असून खेरवाडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपी राहुल पुरोहीत विरोधात माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 आणि भारतीय न्याय संहिता कलम 356 (2), 78 आणि 79 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती खेरवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी दिली आहे.

सोशल माध्यमात झाली होती तरुणीची ओळख : पीडित तरुणी वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी परिसरात आई, वडील आणि दोन बहिणींसोबत राहाते. ही तरुणी साकीनाका इथल्या एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर नोकरी करते. सोशल माध्यमातून तिची राहुल पुरोहीत याच्याशी ओळख झाली. याच ओळखीतून तरुणीनं त्याच्या आयडीवर आपला साधा फोटो पाठवला होता.

नराधमानं फोटो मॉर्फ करुन सोशल माध्यमावर केले व्हायरल : काही वेळातच नराधमानं तोच फोटो अश्लिल प्रकारे मॉर्फ करुन तरुणीला पाठवला. त्यानं त्याच फोटोसोबत संदेश पाठवला. सोबतच मॉर्फ केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी त्यानं दिली. तरुणीनं त्या व्यक्तीच्या सोशल माध्यमातील आयडीवर कॉल करुन असं न करण्याची विनंती केली. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. घडलेल्या प्रकारानं घाबरलेल्या तरुणीनं कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. कुटुंबीयांशी चर्चा करुन तरुणीनं त्या व्यक्तीला 13 जुलैच्या सायंकाळी वांद्रे परिसरातील कार्टर रोड इथं भेटायला बोलावलं. तरुणीसोबत तिची बहीण आणि एक मित्र कार्टर रोड इथं येवून थांबले होते. तो तरुण रात्री साडेनऊ वाजता कार्टर रोड इथं भेटायला आला. इथंसुद्धा त्यानं मॉर्फ फोटो सोशल मीडियावर पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली.

पीडित तरुणीनं त्याला भररस्त्यात दिला चोप : तरुणीनं पुन्हा त्याला तसं न करण्यास विनंती केली. मात्र, तो ऐकत नसल्यानं तरुणीची बहीण आणि मित्र त्यांच्याजवळ आले. त्यांनी या नराधमाला पकडलं. त्यानंतर पीडित तरुणीनं त्याला भररस्त्यात चोप दिला. घटनेची माहिती मिळातच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना पोलीस ठाण्यात नेलं. पोलिसांनी केलेल्या चौकशीत नराधमाचं नाव राहुल पुरोहीत असून तो मीरा-भाईंदरमधील रहिवासी असल्याचं उघड झालं. अखेर पोलिसांनी पीडित तरुणीची तक्रार नोंदवून घेत राहुल पुरोहित विरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.