ETV Bharat / state

महिला डॉक्टरचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट, सफाई कामगाराला अटक - nude video shoot of a woman doctor

Female doctor nude video shoot : कांदिवलीतील सरकारी रुग्णालयात एका महिला डॉक्टरचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Representative photograph
प्रातिनिधिक छायाचित्र (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 6, 2024, 10:12 PM IST

Updated : Aug 6, 2024, 10:25 PM IST

मुंबई Female doctor nude video shoot : बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. या रुग्णालयात काम करणाऱ्या 30 वर्षीय महिला डॉक्टरचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ रुग्णालयाच्या सफाई कामगारानं मोबाईलमध्ये शूट केला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 77 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी जयेश पुरुषोत्तम सोलंकी (40) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी दिली आहे.

आरोपीला अटक : कांदिवलीतील महापालिकेच्या रुग्णालयात महिला डॉक्टरचा अश्लिल व्हिडिओ शूट केल्याची घटना समोर आली आहे. ही डॉक्टर महिला बाथरूममध्ये आंघोळ करत होती. कांदिवली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीली अटक करण्यात आली.

आरोपीला दिला चोप : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 9 च्या सुमारास एक महिला डॉक्टर कांदिवलीतील महापालिकेच्या रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहात आंघोळ करत होती. यावेळी जयेश सोलंकी नावाच्या तरुणानं खिडकीवर चढून गुपचूप तिचा व्हिडीओ शूट केला. डॉक्टर महिलेला संशय आल्यानं तिनं मागं वळून पाहिले. तेव्हा सोलंकी तिचा व्हिडिओ बनवत असल्याचं दिसलं. ती जोरात ओरडल्यानं आरोपी पळून गेला. मात्र, रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून मारहाण केली. हा व्यक्ती या रुग्णालयात 10 वर्षांपासून काम करत असून अविवाहित आहे.

Last Updated : Aug 6, 2024, 10:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.