मुंबई Knife attack on two children : भायखळा परिसरात बाबू गेनू नगरातील हेरंब दर्शन या इमारतीत घरात घुसून एका माथेफिरूनं दोन चिमुकल्यांवर चाकूनं हल्ला केला आहे. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. याबाबत भायखळा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा परब यांनी माहिती दिली आहे.
पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, " आरोपीला घटनास्थळाहून ताब्यात घेतले आहं. दोन्ही चिमुकल्यांची सुखरूप सुटका केली आहे. आरोपीचे नाव लेबांत पटेल (वय ३०) असे आहे. तो तीन दिवसांपूर्वीच ओरिसातील चिंदगोडा येथून मुंबईत आला होता. तो गेल्या तीन दिवसांपासून सीएसएमटी परिसरात राहत होता."
मराठा कंपाउंडमध्ये माथेफिरू घुसला-आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घोडपदेव येथील मराठा कंपाउंड येथे पटेल हा घुसला होता. मात्र, त्याच्या वेड्यावाकड्या चाळ्यांमुळे त्याला कंपाउंडमधील रहिवाशांनी हटकले. त्यानंतर तो घरांच्या कौलांवर जाऊन शर्ट काढून वेडसरपणा करू लागला. त्यानंतर जमलेल्या नागरिकांच्या गर्दीनं त्याला पुन्हा हटकले असता पटेल कौलांवरून पळत हेरंब दर्शन या इमारतीच्या तळमजल्यावर घुसला.
मुलांची सुखरूप सुटका- हेरंब दर्शन इमारतीच्या तळमजल्यावर एकच घर आहे. येथे ट्युशनसाठी भाऊ बहीण आले होते. इतर मुलंदेखील येणार होती. मात्र, त्यादरम्यान माथेफिरू पटेलनं घरात घुसून स्वयंपाक घरातील चाकू घेतला. त्यावर ट्युशन घेणारी महिला आणि १० वर्षाची मुलगी घराबाहेर धावत आले. त्यावेळी त्यानं मुलीच्या मानेवर किरकोळ वार केला. त्यानंतर ९ वर्षाच्या मुलगा घरात असताना त्याने आतून घराला कडी लावून मुलावर चाकूनं वार केले. दरम्यान त्याने गॅसदेखील सुरू केला होता असे पोलिसांना दिसून आलं. याबाबत भायखळा पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी खिडकीतून घरात प्रवेश करून मुलांची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर असून सुखरूप आहे.
'हे' वाचलंत का :
- बदलापूर अत्याचार प्रकरण ; नराधम अक्षय शिंदे याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, बदलापुरात तणावपूर्ण शांतता - Badlapur Minor Girl Sexual Assault
- मुंबईत बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती, दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ - Sexual harassment of minor girls
- कोल्हापूर हादरलं! बिहारी जोडप्याच्या अल्पवयीन मुलीची हत्या, मामानेच अत्याचार करून खून केल्याचा पोलिसांचा अंदाज - MINOR GIRL MURDER