ETV Bharat / state

चोरी करताना चौदाव्या मजल्यावरून पडून मृत्यू, हत्येच्या गुन्ह्यात होता फरार - Mumbai Crime - MUMBAI CRIME

Mumbai Crime News : हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीचा चोरी करतानाच मृत्यू झाला. आरोपीचा चौदाव्या मजल्यावरून पडून आज मृत्यू झाला.

Mumbai Crime News fugitive accused in murder case dies after falling from 14th floor while stealing
चोरी करताना चौदाव्या मजल्यावरून पडून मृत्यू (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 11, 2024, 10:39 PM IST

मुंबई Mumbai Crime News : विक्रोळी परिसरातील हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीचा चोरी करताना 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. अक्षय बाईत असं या आरोपीचं नाव आहे. तो विक्रोळी परिसरात राहत होता. दरम्यान, याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

काय आहे प्रकरण? : रविवारी म्हणजेच आज (11 ऑगस्ट) पहाटे अक्षय हा विक्रोळी टागोरनगर परिसरातील मधुबन सोसायटीत चोरीच्या उद्देशानं गेला होता. यावेळी 14 व्या मजल्यावरून अक्षयचा पाय घसरला. इमारतीवरून पडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती विक्रोळी पोलिसांनी दिली. अक्षयवर या पूर्वीच हत्या, हत्येचा प्रयत्न आणि चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दोनच दिवसांपूर्वी अक्षय आणि त्याच्या साथीदारांनी पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला विवस्त्र करून त्याला मारहाण करत त्याची हत्या केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. तर या गुन्ह्यात अक्षय हा फरार आरोपी होता.

पोलीस अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? : विक्रोळी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, अक्षय बाईत हा विक्रोळी टागोर नगर परिसरातील मधुबन सोसायटीत चोरी करण्यासाठी गेला होता. 14 व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये चोरी करण्याचा त्याचा उद्देश होता. मात्र, यावेळी त्याचा पाय घसरून तो खाली पडला. या घटनेत अक्षयचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी विक्रोळी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा -

  1. मूकबधिर आरोपी हत्येनंतर मृतदेह सुटकेसमधून नेत होते कोकणात, रेल्वे पोलिसांनी केला भांडाफोड - Mumbai crime News
  2. आदित्य ठाकरे, अरविंद सावंत यांच्या नावानं 'बडेमिया' हॉटेलमधून लाखोंची 'बिर्याणी' मागवणाऱ्या ठगास अटक - Mumbai Crime
  3. पतीचा विभक्त राहणाऱ्या पत्नीवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला, जमावाला घाबरून केला आत्महत्येचा प्रयत्न - Husband Attack On Wife

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.