मुंबई Mumbai crime : बंदुकीच्या धाकावर घरात घुसून बळजबरीने लूट करणाऱ्या पाच आरोपींना वाकोला पोलिसांनी अटक केली. बाळू सिंह भैरव सिंह परमार, महिपाल चंगराम सिंह, लेरुलाल उर्फ लकी मिठाई लाल भील, मांगीलाल मीतलाल भील आणि कैलाश भंवरलाल भील अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले की, 19 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता नरेश घरीलाल सोळंकी यांच्या घरात बाळूसिंग परमार नावाचा त्यांचा एक जुना कामगार त्याच्या साथीदारासह त्याचा माजी बॉस नरेश सोळंकी यांच्या घरात बंदुक घेऊन घुसला.
सोन्या-चांदीचा ऐवज लंपास : आरोपींनी नरेश व त्यांच्या पत्नीला मारहाण करून घरातून 1 कोटी 43 लाख 14 हजार 137 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी वाकोला पोलिस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ३९४, ३९७, ३४ आणि १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर व तपास अधिकारी करीत होते. सुनील केंगार याला तांत्रिक तपासातून अटक करण्यात आली. अटकेतील आरोपी सुनीलकडून मिळालेल्या अधिक माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी बाळूसिंग भैरवसिंग परमार याला महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातून अटक केली. हा आरोपी मूळचा राजस्थानचा आहे. त्यानंतर त्याचा सहकारी महिपाल चंगाराम सिंग याला अटक केली.
नोकर निघाला चोर : या प्रकरणातील एक आरोपी पाच वर्षांपूर्वी ज्वेलर्सच्या दुकानात काम करायचा. मात्र त्याच्या अन्य चार साथीदारांच्या मदतीने त्याने 19 तारखेला ज्वेलर्सच्या घरातून बंदुकीच्या जोरावर दागिने चोरले. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पाचही आरोपींना अटक केली आहे. सध्या हे पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. या आरोपींनी याआधी मुंबई शहरात कुणाला बंदुकीच्या धाकावर अशा प्रकारे लुटले आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा :