ETV Bharat / state

कवठेमहांकाळमध्ये एमडी ड्रग्ज साठ्यावर मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई; लाखो रुपयांचं ड्रग्ज जप्त - MD Drugs Seized In Sangli - MD DRUGS SEIZED IN SANGLI

MD Drugs Seized In Sangli : कवठेमहांकाळ येथे एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला. एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर मुंबई पाेलिसांच्या पथकाने छापा टाकला आहे.

MD Drugs Seized In Sangli
एमडी ड्रग्ज साठ्यावर कारवाई
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 8:56 PM IST

इरळीमध्ये एमडी ड्रग्ज साठ्यावर कारवाई

सांगली MD Drugs Seized In Sangli : कवठेमहांकाळ तालुक्यातल्या इरळी येथे एमडी ड्रग्स (MD Drugs) साठ्यावर मोठी कारवाई करण्यात आलीय. मुंबई क्राईम ब्रँचकडून छापा टाकून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्स जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. इरळी गावातल्या एका शेतात असणाऱ्या घरात हा एमडी ड्रग्सचा साठा असल्याची माहिती मिळताच हा छापा टाकण्यात आला आहे.

पुणे ड्रग्ज कनेक्शन आहे का ? : मुंबई क्राईम ब्रँच आणि सांगली पोलिसांच्याकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आलीय. या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्सचा साठा सापडल्याचं सांगण्यात येतंय. तर नेमका हा ड्रग्ज कुठून आला आणि त्याचं काय करण्यात येत होते. तसेच सांगली ड्रग्स आणि पुणे ड्रग्ज कनेक्शन आहे का ? याबाबत पोलिसांच्याकडून अधिकचा तपास सुरू आहे. मात्र नेमका किती ड्रग्ज साठा सापडला याबाबत पोलिसांच्याकडून गुप्तता पाळण्यात आलीय.

300 कोटींचा ड्रग्ज साठा जप्त : नुकतेच पुणे पोलिसांच्याकडून कुपवाड येथून जवळपास 300 कोटींचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला होता. या पाठोपाठ कवठेमहांकाळ तालुक्यातील सापडलेल्या ड्रग्जमुळं शहरात खळबळ उडाली आहे.

9 जणांना अटक : दिनांक 11 मार्च रोजी पुणे पोलिसांनी पुणे, दिल्ली आणि सांगली येथे कारवाई करत जवळपास 3,600 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांना अटक देखील केली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना यामध्ये पाच व्यक्ती पोलिसांच्या हाती लागले होते. त्यामध्ये दोन व्यापारी हे पुण्यातील तर एक व्यापारी आणि दोघे सराफा व्यावसायिक हे दिल्लीतील होते. यांच्यामार्फत मुख्य आरोपी संदीप धुनिया ड्रग प्रकरणातील पैशांचे व्यवहार करत होता.

हेही वाचा -

  1. Drug Racket Exposure : 'त्या' आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा व्यवहार हवालामार्फत? 9 जणांना अटक
  2. पुणे अंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात ईडीची उडी; मास्टरमाईंड संदीप धुणेची प्रेयसी पोलिसांच्या रडारवर
  3. पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई, 340 किलो मेफेड्रोन सदृश्य ड्रग्जसाठा जप्त, दोघांच्या मुसक्या आवळल्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.