ETV Bharat / state

"भावांनो, योजनेचे पैसे बँकेनं कट केले"; लाडक्या बहिणींची आर्त हाक, महिलेला रडू कोसळलं - Majhi Ladki Bahin Yojana - MAJHI LADKI BAHIN YOJANA

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळं महिला वर्गात आनंदाचं वातावरण आहे. पैसे काढण्यासाठी महिला बँकेत गर्दी करत आहेत. या योजनेचा काही ठिकाणी गैरफायदा देखील घेतला जात असल्याचं उघड झालं. पुण्यात असाच प्रकार समोर आलाय. वाचा सविस्तर बातमी....

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेचे पैसे कट (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2024, 7:05 PM IST

Updated : Sep 3, 2024, 7:31 PM IST

पुणे Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्य सरकारनं नुकतंच 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' जाहीर केली होती. या योजनेच्या माध्यमातून लाखो बहिणींच्या खात्यात दरमहा पंधराशे म्हणजेच दोन महिन्याचे एकदम तीन हजार रुपये पाठवण्यात आले होते. योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर अनेक महिलांनी सरकारचे आभार देखील मानले. या योजनेचे जमा झालेले पैसे बँकांना कट करता येणार नाहीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, तरी देखील पुण्यात अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे बँकेने कट केल्याचं समोर आलंय. यावेळी व्यथा मांडताना महिलेला रढू कोसळलं.

'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीनं महिलांशी साधला संवाद (Source - ETV Bharat Reporter)

बँक खात्यातून पैसे कट : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या अंतर्गत शासनाच्या वतीनं एक कोटीहून अधिक महिलांना दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा केले आहेत. हे जमा झालेले पैसे आता बँक खात्यातून कट देखील व्हायला सुरुवात झाली. योजनेचे जमा झालेले पैसे बँकेनं कट केल्याचा आरोप पुण्यातील घोरपडे पेठ परिसरात राहणाऱ्या अनेक महिलांनी केलाय. या महिलांकडून आता संताप व्यक्त केला जात आहे.

महिलांचा गंभीर आरोप : "आम्ही 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' या योजनेचा अर्ज भरला आणि काही दिवसांनी खात्यात दोन महिन्यांची रक्कम देखील जमा झाली. मात्र, रक्कम जमा झाल्यानंतर जेव्हा आम्ही बँकेत गेलो, तेव्हा आमचे पैसे बँकेनं कट केल्याचं समोर आलं. तुम्हालाच जास्त पैसे भरावे लागतील, असं आम्हाला बँकेनं सांगितलं. बँकेनं अशा पद्धतीनं पैसे कट करू नये, असं सरकारनं सांगितल्याचं आम्ही बँकेला सांगितलं. शासनाला काय, आम्ही आमच्या नियमानं पैसे कट करत असल्याचं बँकेनं आम्हाला सांगितलं," असा गंभीर आरोप महिलांनी केलाय.

मुख्यमंत्र्यांना केली विनंती : एका महिलेनं सांगितलं की, "मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री या लाडक्या भावांनी आमच्या खात्यात पैसे टाकले. तेव्हा मी घरच्यांना सांगितलं की, या पैशांवर कोणाचाही अधिकार नाही. माझ्या औषधोपचारासाठी हे पैसे वापरणार, असंही घरी सांगितलं. मात्र, जेव्हा मी पैसे काढायला बँकेत गेले तेव्हा बँकेनं मला, तुमचे पैसे आम्ही कट केल्याचं सांगितलं. माझ्या लाडक्या भावाला विनंती आहे की, त्यांनी बँकेला सांगून आमचे पैसे आम्हाला परत द्यावेत."

बँकेनं पैसे कट केले : "माझ्या खात्यात योजनेचे पैसे आले. मी पैसे काढण्यासाठी गेले असता बँकेनं मला, पैसे मिळणार नाही असं सांगितलं. तुमचे पैसे कर्जामध्ये कट झाले, असं सांगितलं. भावानं पाठवलेल्या पैशावर बँकेचा अधिकार नाही, त्या पैशांवर माझाच अधिकार आहे, असं मी त्यांना सांगितलं. मी बँकेचे नियमित कर्ज भरते, तरी माझे पैसे कट का केले? मला माझे पैसे परत पाहिजेत, अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडं करत आहे, अशी विनंती करत लता सोनवणे यांनी बँकेवर संताप व्यक्त केला.

दरम्यान, वरील आरोप हे महिलांनी केले आहेत. याबाबत बँकांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं नाही.

हेही वाचा

  1. एसटी संपाचा फटका कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना; सरकारनं केली 'ही' सोय - ST Employees Strike
  2. भाजपाच्या लाडक्या उद्योगपतीकडून शिवरायांच्या पुतळ्याची मुंबईत विटंबना-संजय राऊतांचा आरोप - Sanjay Raut today news
  3. जागावाटपाबाबत अजित पवारांचा डाव, शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर होणार का कमी? - Mahayuti Seat Sharing

Last Updated : Sep 3, 2024, 7:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.