ETV Bharat / state

1 हजार 500 रुपयांत काय होणार? 'लाडकी बहीण' योजनेवरून सुप्रिया सुळेंनी महायुतीला सुनावलं - Majhi Ladki Bahin Yojana - MAJHI LADKI BAHIN YOJANA

Supriya Sule criticized Mahayuti : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं मी स्वागत केलंय, मात्र एका महिन्याचा किराणा आणण्यासाठी 1 हजार 500 रुपये पुरेसे आहेत का, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

MP Supriya Sule
सुप्रिया सुळे (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 5, 2024, 4:15 PM IST

Updated : Jul 5, 2024, 4:36 PM IST

पुणे Supriya Sule criticized Mahayuti : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1 हजार 500 रूपये मिळणार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाना साधला आहे.

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

1 हजार 500 रुपयांत काय होणार : "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दीड हजार रुपयात किती रेशन मिळतं, याचा मी अभ्यास केला आहे. एखादी चांगली योजना सरकार आणत असेल, तर त्याचं स्वागत आहे. पण महागाईच्या काळात दीड हजार रुपयात महिलांना किती दिलासा मिळणार? याचा देखील विचार करायला हवा. देशात महागाई, भ्रष्टाचार बेरोजगारी आहे. 1 हजार 500 रुपयांत काय होणार, याचा कधी विचार केला आहे का? महिनाभराचं रेशन, भाजीपाला यात येणार का? याचं उत्तर सरकारनं द्यावं", अशी मागणी त्यांनी केलीय.

कृषी विभागात भ्रष्टाचार : "महाराष्ट्रातही कृषी विभागात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. 118 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. आरएसएसच्या माध्यमातून ही माहिती पुढं आली आहे. त्यांनी या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा केलाय. तसंच त्यांनी या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, पण त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळं बजरंग सोनवणे त्यावर संसदेत बोलणार होते. या प्रकरणाचं उत्तर महाराष्ट्राला मिळावं, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं करण्यात आली आहे. सध्याच्या सरकारनं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं पाप केलं आहे", असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

महायुतीत 'क्रेडिट' युद्ध : "या लोकांनी कोविडमध्ये स्वत:चे फोटो लटकवण्याचं काम थांबवलं नाही. त्यामुळं जाहिरातींमध्ये कुठंही फोटो लावले जात आहेत. कधी ट्रिपल इंजिन सरकार तर कधी दुहेरी इंजिन सरकार असं बोललं जातं. नेमकी किती इंजिन सरकार आहे, माहीत नाही. कारण त्यांच्या पक्षाचे प्रत्येक प्रवक्ते वेगवेगळे आकडे सांगत आहे. महायुतीच्या बॅनर युद्धातून कोणाचा फोटो कोण श्रेय घेतय", असा टोला त्यांनी महायुती सरकारला लगावला आहे.

सरकारकडून प्रतिसाद नाही : "आचारसंहितेमुळं निधी मिळालेला नाही. निकाल लागून 2 आठवडे झाले. संसदेचं अधिवेशन सुरू आहे. बारामतीतील रस्त्यासाठी नितीन गडकरी यांची भेट घेतली. अनेक विषयांवर मंत्र्यांच्या बैठका झाल्या. महाराष्ट्रातील कृषी, रस्ते, रेल्वे प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी खासदारांनी भेट घेतली. महाराष्ट्रातील प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला नीट पेपरवर सविस्तर चर्चा हवी होती. आज देशात कोणत्याही स्पर्धा परीक्षेत प्रचंड भ्रष्टाचार आहे. पुढच्या पिढीला नोकऱ्या नाहीत. स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेवर कोणालाही घेतलं जाणार नाही. त्यामुळं NEET वर सविस्तर चर्चा करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर सरकारकडून देशाला उत्तर मिळालेलं नाही. NEET सारखा गंभीर, संवेदनशील विषय राजकारणापासून बाजूला ठेवायला हवा होता, पण तसं झालेलं नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली".

'हे' वाचलंत का :

  1. "सरकारी पैशातून मतं खरेदी करण्याचा प्रयत्न..."; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर गंभीर आरोप - Maharashtra Monsoon Session 2024
  2. टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीवरुन सत्ताधारी- विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, कशावरून नेमका आहे वाद? - Team India Mumbai Victory Parade
  3. मुस्लिम समाजाची मतं चालतात, प्रतिनिधित्व देताना हात आखडता का? काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांचा सूर - Muslim Representation

Last Updated : Jul 5, 2024, 4:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.