चंद्रपूर : MP Imtiaz Jaleel : खासदार नवनीत राणा यांनी हिम्मत असेल तर इम्तियाज जलील यांनी अमरावती येथून लढून दाखवावं असं आव्हान दिलं. यावर आता खासदार इम्तियाज जलील यांनी नवणीत राणा यांच्या आव्हानाला खरमरीत प्रत्युत्तर दिलंय. आधी नवनीत राणा यांनी मला बोगस अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत करावी तरंच मी त्यांच्याविरोधात लढण्यास पात्र असेल. तसंच, राणा यांना हे पण माहिती नाही की त्या ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडून येतात तो मतदारसंघ राखीव आहे. जलील हे आज चंद्रपूर येथे आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील भाष्य केलं.
हिम्मत असेल तर त्यांनी लढाव : नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आल्या. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मात्र, राणा यांनी बोगस अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र सादर केलं असा त्यांच्यावर आरोप आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून लवकरच यावर निकाल येणार आहे. राणा यांनी नुकत्याच एका सभेत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना आव्हान दिलं. जर त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी अमरावती येथे येऊन माझ्या विरोधात निवडणूक लढून दाखवावी असं आव्हान दिलं होतं. त्यावर जलील यांनी राणा यांचा चांगलाच समाचार घेतला.
त्यांना काही माहिती तीर आहे का ? नवनीत राणा यांच्या आव्हानाला स्वीकारून आपण अमरावती येथून त्यांच्याविरोधात निवडणूक लढणार का? याबाबत विचारले असता ते म्हणाले. आधी नवनीत राणा यांनी मला बोगस अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत करावी. जर प्रमाणपत्र मिळालं तरच मी निवडणूक लढू शकेन असा टोला त्यांनी यावेळी लगावला. त्यांना हे सुद्धा माहिती नाही ज्या लोकसभा क्षेत्रात निवडणूक लढविण्यासाठी अनुसूचित जातीचा उमेदवार असणं आवश्यक आहे. ही साधी बाब सुद्धा राणा यांना माहिती नाही यातच सर्व आलं असंही जलील म्हणाले यावेळी म्हणाले. आता जलील यांना राणा प्रत्युत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं आहे.
हेही वाचा :
2 दोघांच्या भांडणात तिसरा! छत्रपती संभाजीनगर 'लोकसभा' यंदाही रंगणार, वाचा कोण आहे इच्छूक
3 मिटकरींनी दिलेलं चॅलेंज आव्हाडांनी स्वीकारलं; मात्र, 'तुतारी' वाजवण्यासाठी ठेवली अट