ETV Bharat / state

मनसेच्या इंजिनाची दिशा काय? विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे राज ठाकरेंचे आदेश - Raj Thackeray on Assembly Election - RAJ THACKERAY ON ASSEMBLY ELECTION

Maharashtra Assembly elections : मनसेचा राज्यव्यापी पदाधिकारी मेळावा आज वांद्रे येथील हॉटेल रंगशारदामध्ये पार पडला. यावेळी राज ठाकरेंची पुन्हा एकदा मनसेच्या अध्यक्षपदी बिनविरोध करण्यात आली.

MNS President Raj Thackeray
राज ठाकरे (ETV BHARAT MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 5:36 PM IST

Updated : Jun 13, 2024, 6:57 PM IST

मुंबई Maharashtra Assembly Elections : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयारीला लागलीय. आज वांद्रे येथील हॉटेल रंगशारदामध्ये मनसेचा राज्यव्यापी मेळावा पार पडला. या मेळाव्याला मनसेचे सर्व जिल्हाध्यक्ष, शहर प्रमुखांसह अन्य पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या मेळाव्यात राज ठाकरेंनी मार्गदर्शन केलं. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं त्यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. या विधानसभा निवडणुकीत मनसे 20 जागांवर दावा करेल, अशी चर्चा होती. मात्र, आजच्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जागा स्वबळावर लढण्याच्या दिशेनं तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहेत.

मोदींच्या विरोधामुळं 'मविआ'ला मतदान : या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले, 'या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला झालेलं मतदान नरेंद्र मोदी यांना असलेल्या विरोधातून झालं. जनतेत महाविकास आघाडीबाबत प्रेम आहे, असं काही नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मराठी माणसांची मतं मिळतील, असं वाटलं होतं. पण तसं झालेलं नाही. त्यांना मिळालेली मतं मुस्लिम समाजाची आहेत. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेतून 40 आमदार फुटले होते. पण, शिवसेनेचं नाव, चिन्ह फुटलेल्या गटाला दिल्याचं मतदारांना पटलं नाही. त्याचाच फटका महायुतीला बसला आहे'.

विधानसभेच्या 200 ते 225 जागा लढवणार : 'निवडणुकी आधी 'मी' दिल्लीत अमित शाह यांना भेटलो. या भेटीत भाजपानं बाळासाहेब ठाकरे यांच्यावरुन राजकारण करु नये, असं मी त्यांना सांगितलं. बाळासाहेब ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. मनसेनं वीस जागा महायुतीकडं मागितल्याची बातमी माध्यमांनी दिली. मात्र, आपण 200 ते 225 जागा लढऊ. त्यामुळं कार्यकरत्यांनी निवडणूक लढवण्याच्या दिशेनं तयारीला लागावं, असं ते म्हणाले.

मनसेनं युतीधर्म पाळला : लोकसभा निवडणुकीत फोडाफोडीच्या राजकारणाचा महाराष्ट्रात भाजपाला मोठा फटका बसलाय. या पराभवानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह समोर येत आहेत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यानंतर कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपानं मनधरणी केल्यानंतर मनसेनं युतीधर्म पाळला. मात्र, आता विधानसभेला मनसेच्या वाट्याला एकला चलो रे म्हणण्याची वेळ आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. त्यामुळं राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे आदेश : राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, 'आजच्या बैठकीला संपूर्ण राज्यातून कार्यकर्ते आले होते. सर्वांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे आदेश देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपाला पाठिंबा दिला. एकही जागेवर आम्ही निवडणूक लढवली नाही. आता विधानसभेची निवडणूक आहे. यावेळी आम्ही 200 ते 250 जागांवर निवडणूक लढवू. राज ठाकरेंनी जिथं महायुतीचा प्रचार केला, त्या प्रत्येक जागेवर महायुतीचा उमेदवार विजयी झालाय. प्रत्येक जिल्ह्यात आमचे 25 हजारांहून अधिक मतदार आहेत. पक्ष स्थापन झाल्यापासून मनसेनं एकट्यानं निवडणूक लढवली आहे. भविष्यातही लढणार आहे. यात महायुतीचा कोणताही मुद्दा नाही. त्यामुळं मनसेचं इंजिन पुन्हा एकदा एकला चलो 'रे'च्या दिशेनं धावत असल्याचं दिसून येत आहे.

ठाकरेंची अध्यक्षपदी बिनविरोध निवड : या बैठकीचं आणखी एक महत्त्व म्हणजे मनसेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ आता संपत आला असून, नवीन अध्यक्षांची निवड आज झाली. या संदर्भात पक्षांतर्गत निवडणूक झाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. पक्षांतर्गत निवडणूक माटुंगा येथील कल्चरल सेंटर येथे पार पडली. या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या विरोधात लढण्यासाठी कोणताही उमेदवार पुढं न आल्यानं राज ठाकरे यांची पक्षाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

हे वचालंत का :

  1. संघाच्या ऑर्गनायझरमधून भाजपावर ताशेरे; पण फडणवीसांसोबत अदृश्य शक्ती कुठली? - RSS Criticize BJP
  2. लोकसभेतील पराभवानंतर सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर लागणार वर्णी; अर्ज केला दाखल - Sunetra Pawar
  3. भाजपा अजित पवारांना सत्तेपासून दूर करणार; भाजपात आत्मचितंन सुरू - महेश तपासे - Ajit Pawar News

Last Updated : Jun 13, 2024, 6:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.