ठाणे Raj Thackeray on Toll Naka : शुक्रवारी नाशिक दौरा आटोपून राज ठाकरे मुंबईच्या दिशेनं जात असताना, कोपरी टोलनाक्यावर अनेक गाड्या ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. गाड्यांच्या रांगा बघून संतापलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गाड्यांना वाट करून देत टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.
राज ठाकरे संतापले : ठाण्यातील कोपरी टोल नाक्यावर वाहनांची भलीमोठी रांग लागली होती. त्याचवेळी राज ठाकरे हे नाशिक येथील नियोजित दौरा आटोपून मुंबईकडं जात होते. टोल नाक्यावर वाहनांची रांग पाहून राज ठाकरे हे गाडीतून खाली उतरले आणि वाहनांना लवकर तेथून सोडण्यास सुरुवात केली. तसंच त्यांनी टोल नाक्यावरील मॅनेजरलाही दम भरल्याचं या व्हिडिओमधून दिसून येतंय.
टोल नाका प्रशासनावर मनसे अध्यक्ष भडकले : बराच वेळ गाडीत बसून राहिलेले राज ठाकरे यांनी संतप्त होऊन स्वतः सूत्र हाती घेतली. त्यांनी थेट टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांना धारेवर धरत आपला ठाकरी हिसका दाखवला. टोल नाक्यावर थांबलेल्या शेकडो गाड्यांना राज ठाकरे यांनी वाट करून दिली. वाहतूक कोंडीत अडकलेल्या शेकडो गाड्या त्यांनी टोल न भरताच जाऊ दिल्या. यावेळी संतापलेल्या राज ठाकरे यांनी तिथे उपस्थित असलेल्या टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं.
कोपरी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी : काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी ठाणे येथील टोल नाक्यावरच्या गाड्यांच्या रांगा पाहून संताप व्यक्त केला होता. शुक्रवारी देखील ठाण्यातील कोपरी टोल नाक्यावर पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. आपला नाशिक येथील नियोजित दौरा आटोपून राज ठाकरे हे मुंबईच्या दिशेने जात असताना, कोपरी टोल नाक्यावर त्यांच्या गाड्यांचा ताफा ट्रॅफिकमध्ये अडकला होता. तसंच या टोल नाक्यावर इतर गाड्यांचीही लांबच रांग लागली होती.
याआधी टोल नाक्यावर आंदोलन : राज्यातील टोल वाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याआधीही आक्रमक भूमिका घेतली होती. अनेकदा टोल नाक्यांवर तोडफोड देखील करण्यात आली होती. टोल नाक्यावरुन आक्रमक झालेल्या मनसेने मुलुंड, पनवेल आणि ऐरोली टोल नाक्यावर यापूर्वी आंदोलन केलं होतं.
हेही वाचा -
वाहनांची रांग पाहून राज ठाकरे उतरले टोल नाक्यावर; मग काय झालं? पाहा व्हिडिओ
मोदींच्या राज्यात बनावट टोल नाका! दीड वर्षांपासून सुरू लोकांची फसवणूक