ETV Bharat / state

खासगी शिकवणीच्या शिक्षिकेची चिमुकलीला मारहाण; पीडितेची मृत्यूशी झुंज, अद्याप कारवाई नाही - PRIVATE CLASS TEACHER BEATS STUDENT

खासगी शिकवणी वर्गात मस्ती केल्याच्या क्षुल्लक कारणावरुन शिक्षिकेनं विद्यार्थिनीला जबर मारहाण केली. याप्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून विद्यार्थिनी आयसीयूत दाखल आहे.

Private Class Teacher Beats Student
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2024, 11:28 AM IST

Updated : Oct 23, 2024, 2:26 PM IST

पालघर : खासगी शिकवणी वर्गाच्या शिक्षिकेनं विद्यार्थिनीला केलेल्या मारहाणीत चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. या चिमुकलीची मागील सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरू असून तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. खासगी शिकवणी वर्गात मस्ती करत असल्यानं शिक्षिका रिना सिंग हिनं या विद्यार्थिनीला जबर मारहाण केली. या चिमुकलीवर मुंबईतील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना नालासोपाऱ्याच्या ओस्वाल नगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षिकेला पोलिसांनी नोटीस दिली आहे. मात्र इतके दिवस उलटून गेले तरी संबंधित शिक्षकेला अटक न झाल्यानं संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Private Class Teacher Beats Student
तुळींज पोलीस ठाणे (Reporter)

शाळेत मस्ती करते म्हणून विद्यार्थिनीला जबर मारहाण : नालासोपारा इथल्या ओस्वाल नगर परिसरात राहणाऱ्या चिमुकलीला खासगी शिकवणी घेणाऱ्या रिना सिंग या शिक्षिकेनं मारहाण केली. ही चिमुकली पाचवीत शिकत होती. मात्र वर्गात मस्ती करते, या क्षुल्लक कारणांवरुन तिला रिना सिंग या शिक्षिकेनं मारहाण केली. या मारहाणीमुळे मागील सात दिवसांपासून ही चिमुकली अतिदक्षता विभागात दाखल आहे. वसई तालुक्यात अनेक शाळा अनधिकृत असून आता खासगी शिवकवणी वर्गसुद्धा अनाधिकृत आहेत. त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नसल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

खासगी शिकवणीच्या शिक्षिकेची चिमुकलीला मारहाण; पीडितेची मृत्यूशी झुंज, अद्याप कारवाई नाही (Reporter)

आम्ही मारहाण केली नसल्याचा शिकवणी संचालकांचा दावा : पीडितेचे वडील अंबाराम यांनी सांगितलं की, माझ्या मुलीवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ती व्हेंटिलेटर आहे. तिला दिवसाला उपचाराचा 25 हजार रुपये खर्च आहे. आमची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं आम्ही सामाजिक संस्थाकडं मदत मागत आहोत. माझ्या मुलीला मारहाण करणार्‍या शिक्षिकेवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात रत्ना सिंग विरोधात कलम 125 (अ) (ब) तसेच बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदाच्या अधिनिमय 75 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही संबंधित शिक्षिकेला नोटीस पाठवली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी अरीना क्लासेसच्या संचालकांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आम्ही मारहाण केलीच नसल्याचं सांगून हात झटकले आहेत. मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.

हेही वाचा :

  1. शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानं प्रकरण आलं समोर - Teacher Beaten Student Pune
  2. Teacher Beaten To Minor Boy क्षुल्लक कारणावरून शिक्षिकेची अल्पवयीन मुलास मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
  3. Teacher beaten students : टिळा लावलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकाची अमानुष मारहाण

Last Updated : Oct 23, 2024, 2:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.