ETV Bharat / state

मंत्रिपद निश्चित आता पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच: शिवसेना - भाजपा दोघांचा दावा, कोण मारणार बाजी ? - RACE FOR GUARDIAN MINISTER POST

शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांची पालकमंत्री पदावर वर्णी लागेल अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र भाजपाचे मंत्री अतुल सावे यांनीही पालकमंत्री पदावर दावा केला आहे.

Race For Guardian Minister
संग्रहित छायाचित्र (reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2024, 2:09 PM IST

छत्रपती संभाजीनगर : राज्याचं मंत्रिमंडळ जाहीर झालं असलं, तरी पालकमंत्री पदाचा पेच अद्याप कायम आहे. नव्यानं झालेल्या मंत्र्यांनी आता आपल्या पक्षाच्या नेत्यांकडं फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. छ. संभाजीनगर जिल्ह्यात शिंदे गट शिवसेना आणि भाजपामध्ये स्पर्धा लागली आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि ओबीसी विभाग मंत्री अतुल सावे दोघांनीही पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करत दावा केलाय. त्यामुळे शिवसेनेकडं असलेलं पद भाजपाच्या पारड्यात पडणार का? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलाय.

शिवसेना करणार पुन्हा दावा : छ. संभाजीनगर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. आधी ठाकरे गटाची ताकद भक्कम असताना एकनाथ शिंदे यांनी बंड करत ती कमकुवत केली. आता शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यानं शिवसेनेच्याच मात्र दुसऱ्या गटाला जनाधार मिळाल्याचं दिसून आले. पक्ष एक, शिलेदार तेच मात्र नेता दुसरा असा कौल मतदारांनी दिल्यानं मंत्रिपदाबाबत दावा अधिक भक्कम झाला. 2019 मध्ये 9 पैकी 5 तर 2024 मध्ये 6 आमदार निवडणूक जिंकल्यानं पालकमंत्री पदावर शिवसेना दावा करत आहे. मागील मंत्रिमंडळात संदीपान भुमरे यांना संधी देण्यात आली. मात्र ते आता खासदार असल्यानं अनुभवी नेता म्हणून संजय शिरसाट यांना संधी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. इतकंच नाही तर पक्षाकडं तशी ताकद देखील त्यांनी लावली आहे.

पालकमंत्री पदासाठी भाजपा आग्रही : जिल्ह्यात शिवसेनेच्या मदतीनं भाजपा पक्षानं आपली ओळख निर्माण केली. तीनवेळा मंत्रिपद मिळालेले अतुल सावे यांना पालकमंत्री करावं यासाठी पक्ष किंबहुना स्थानिक नेते आग्रही आहेत. 2021 मध्ये भाजपानं शिवसेनेला सोबत घेत सत्ता स्थापन केली. त्यांनतर अनेक पदांवर त्यांनी आपला दावा केला. त्यात महत्त्वाचं असलेलं पालकमंत्री पद देखील होतं. पक्षातील स्वच्छ प्रतिमा असलेले नेते म्हणून प्रचलित असलेल्या अतुल सावे यांना संधी देण्याची मागणी करण्यात आली. मात्र संधी देण्यात आली नाही. मात्र या मंत्रिमंडळात अनुभवी मंत्र्यांपैकी असलेल्या सावेंना पालकमंत्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत शिवसेनेला संधी देण्यात आली आणि भाजपाकडं पद मिळावं, यासाठी पक्षश्रेष्ठी मागणी केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली. त्यामुळे आता शिरसाट की सावे असा प्रश्न उपस्थितीत झाला. शिवसेना आपल्याकडं हे पद ठेवते की भाजपा ते आपल्याकडं ओढून आणेल याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

  1. मंत्रिपद, खातेवाटप अन् आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच
  2. दादा, साहेब की अध्यक्ष; कोण होणार कोल्हापूरचे पालकमंत्री?
  3. पालकमंत्री पदावरून कोल्हापुरात 'रस्सीखेच', शिवसेनेचं पारडं जड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.