मुंबई : नैसर्गिक आपत्तीच्या काळात इतर राज्यांच्या मदतीला धावून जाण्याची महाराष्ट्राची आजवर परंपरा राहिली आहे. त्याला अनुसरुनच राज्य सरकारनं भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे संकटात असलेल्या केरळ आणि आसामसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.
मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळं गंभीर परिस्थिती निर्माण झालेल्या आसाम आणि केरळ राज्याच्या मदतीला महाराष्ट्राचा सह्याद्री धावून आला. राज्य सरकारनं तातडीने केरळ आणि आसाम राज्याला प्रत्येकी वीस कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून दिली आहे. महसूल आणि वन विभागाने या संदर्भातील शासन आदेश मंगळवारी जारी केला.
आसाम आणि केरळला प्रत्येकी दहा कोटींची मदत- आसाम आणि केरळमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात भूस्खलन झाल्यानं शेकडो लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. अनेक ठिकाणी जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्यानं नागरिकांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आसाम आणि केरळ या दोन राज्यांना प्रत्येकी दहा कोटींची मदत करण्यात आली आहे. यापूर्वी गुजरातसह अन्य राज्यांनाही महाराष्ट्र सरकारकडून मदत देण्यात आली होती.
अशी आहे केरळमध्ये स्थिती- केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे 387 जणांचा मृत्यू झाला. सलग सातव्या दिवशी 1500 हून अधिक कर्मचारी भूस्खलनात अडकलेल्या लोकांना शोधण्यात गुंतले. तर 180 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. केरळमधील 6759 लोकांना या शिबिरांमध्ये जिल्हाभरात हलवण्यात आले आहेत. त्यात 1983 कुटुंबे, 2501 पुरुष, 2677 महिला, 1581 मुले आणि 20 गर्भवती महिलांचा समावेश आहे. 30 जुलै रोजी, वायनाडमधील चुरलमाला आणि मुंडक्काई येथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले. जिल्हा प्रशासनानं रविवारीउशिरा रात्री भूस्खलनात मृत्यू झालेल्या अज्ञात लोकांच्या पार्थिवावर सामूहिक अंत्यसंस्कार केले.
- आसाममध्ये 18 जिल्ह्यांना पुराचा फटका- आसाममधील पूरस्थितीत 93 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. आसाममध्ये पुरामुळे हजारो गावे पाण्याखाली गेल्याचं दिसून आले. राज्यातील 18 जिल्हे पुराच्या विळख्यात गेले. त्यानंतर 172 मदत छावण्या आणि वितरण केंद्रांमध्ये 58,000 हून अधिक लोकांना आश्रय घ्यावा लागला होता.
हेही वाचा-