ETV Bharat / state

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं सर्वेक्षण पूर्ण; मात्र दहा टक्के मुंबईकरांनी दिला सर्वेक्षणासाठी नकार

Maratha Reservation Mumbai Survey : मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं सर्वेक्षण पूर्ण झालं असून शंभर टक्के सर्वेक्षण झाल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त सुधाकर शिंदे यांनी केला आहे. या सर्वेक्षणादरम्यान सुमारे चार लाखांपेक्षा अधिक मुंबईकरांनी सर्वेक्षणाला नकार दिल्याचंही त्यांनी सांगितलंय.

Maratha Reservation Mumbai Survey
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं सर्वेक्षण पूर्ण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 7:33 PM IST

मुंबई Maratha Reservation Mumbai Survey : राज्य सरकारच्या वतीनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटच्या वतीनं एक ॲप तयार करून त्या ॲपच्या माध्यमातून 27 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान सर्वेक्षण करण्यात आलं. यासाठी शासनाच्या महसूल यंत्रणेमार्फत जिल्हानिहाय आणि तालुका निहाय सर्वेक्षणासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर महानगरपालिका स्तरावर महापालिकेतील अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणाची अंतिम आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही. मात्र, मुंबईतील सर्वेक्षण पूर्ण झालं असल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त सुधाकर शिंदे यांनी केला आहे.

मुंबईत झालं शंभर टक्के सर्वेक्षण : मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मुंबईतील सर्व विभागांमध्ये गेल्या सात दिवसांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं. त्यानुसार 23 तारखेला दोन लाख 67 हजार, 24 तारखेला पाच लाख 81 हजार, 25 तारखेला सहा लाख 87 हजार, 26 तारखेला चार लाख 53 हजार, 27 तारखेला चार लाख 82 हजार, 28 तारखेला तीन लाख 90 हजार, 29 तारखेला चार लाख 18 हजार, 30 तारखेला चार लाख 18 हजार आणि 31 तारखेला एक लाख 62 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आलं.

दहा टक्के मुंबईकरांचा सर्वेक्षणाला नकार : यामध्ये सुमारे 70 टक्के मुंबईकरांनी सर्वेक्षणाला प्रतिसाद दिला. सर्वेक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या मुंबईकरांची संख्या 27 लाख 47 हजार 669 इतकी आहे. तर सुमारे 19 टक्के मुंबईकरांची घरे बंद आढळली. तसंच दहा टक्के मुंबईकरांनी सर्वेक्षणाला नकार दिला. सर्वेक्षणाला नकार देणाऱ्या मुंबईकरांची संख्या 4 लाख 4057 इतकी होती, अशी माहिती सुधाकर शिंदे यांनी दिली आहे. तसंच एकूणच मुंबईकरांच्या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट हे शंभर टक्के पूर्ण झाले आहे, असा दावाही शिंदे यांनी केलाय. राज्यातील सर्वेक्षणाची स्थिती आणि आकडेवारी तसंच संपूर्ण आकडेवारी एकत्र करून किती टक्के सर्वेक्षण झालं याची माहिती लवकरच उपलब्ध होईल, असं राज्य मागासवर्ग आयोगाकडून सांगण्यात आलंय.

हेही वाचा -

  1. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस; लवकरच अहवाल येणार
  2. मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी 'असं' सुरू आहे सर्वेक्षण; 'ईटीव्ही भारत'चा ग्राऊंड रिपोर्ट
  3. सर्वेक्षणासाठी शिक्षक रस्त्यावर तर शाळेत मुले वाऱ्यावर, तरी सर्वेक्षणात अनंत अडचणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.