जालना Manoj Jarange Hunger Strike : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. रविवारी मध्यरात्री मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली. त्यांना भोवळ आल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला. त्यामुळे मनोज जरांगे यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक आंदोलनस्थळी दाखल झालं. मनोज जरांगे यांना तातडीनं उपचार घेणं गरजेचं आहे, असं यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावाही मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी केला.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस : मराठा समाजाला ओबिसी कोट्यातून आरक्षण मिळावं, म्हणून मनोज जरांगे यांनी आंदोलन उभं केलं आहे. यावेळी तब्बल सहाव्यांदा मनोज जरांगे हे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलनाला बसले आहेत. आज मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा हा सातवा दिवस आहे. मात्र त्यांची तब्येत खालावल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं, अशी माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली.
आज संभाजीराजे छत्रपती घेणार भेट : सरकारनं काढलेल्या अध्यादेशाची कायद्यात अंमलबजावणी करावी, सातारा गॅजेट, हैदराबाद गॅजेट, बॉम्बे गॅजेट लागू करावे, मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे माघारी घेण्यात यावे, अशा मागण्या सरकारनं पूर्ण कराव्यात, यासाठी मनोज जरांगे जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सतवा दिवस आहे. आज मनोज जरांगे यांच्या भेटीला स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती हे आंतरवली सराटी इथं येणार असून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणार आहेत.
हेही वाचा :