अहमदनगर Khandoba Yatra of Devgad : जत्रा म्हटलं की मनोरंजन आणि ज्या देवाची यात्रा त्याचं देवदर्शन. गर्दी ओघानेच आली. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील देवगड येथे माघ पोर्णिमेनिम्मीत भरणाऱ्या खंडेरायाच्या यात्रेत घोडा मालक आणि अश्व प्रेमीची मोठी गर्दी दिसून आली आहे. देवगड येथे होत असलेल्या विविध जातींच्या घोडे प्रदर्शन आणि स्पर्धेमुळे या यात्रेचा लौकिक राज्यभर पसरतोय. घोड्यांचं प्रदर्शन, विक्री आणि नृत्य स्पर्धेच हे सातवं वर्ष आहे.
घोड्याची किंमत 1 कोटी रुपये : देशभरातील शेकडोच्या संख्येने घोडे यात सहभागी झाल्यानं यात्रेची रौनक काही औरच होती. देवगड येथे संगमनेरातील अश्वप्रेमी असोशिएशनच्या वतीने भव्य अश्व प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या अश्व प्रदर्शनात विवीध जातीच्या 100 घोड्यांचा सहभाग होता. यावेळी त्यांनी नृत्य सादर केलं. साहसी नृत्य, थाळा नृत्य, बुलेटवरील नृत्य असं नृत्य झालं. दरम्यान, आजच्या प्रदर्शनासाठी देशभरातील अश्व मालकांनी सहभाग नोंदवला होता. यंदाच्या वर्षीच खास आकर्षक ठरलं ते अहमदनगर येथील सचिन जगताप यांचा अश्व. या सत्तर इंच उंचीच्या घोड्याची किंमत 1 कोटी रुपये होती. हा घोड्याची अनेक वैशिष्ट्य आहेत.
प्रदर्शनात महागडे घोडेही सामील : वेगवेगळ्या घोड्यांच्या जाती त्यांचं नृत्य हे सर्वांसाठी आनंददायी ठरत होतं. दरम्यान अश्वांना शिकवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या अश्वमालकांनाही प्रेक्षकांची वाहवाह मिळवली. देवगड येथील हे खंडोबाचं मंदीर प्रती जेजूरी म्हणून ओळखलं जात होत. खंडोबाचं वाहन हे घोडा असल्याने येथे आलेल्या अश्वांना पहाण्याची खंडोबा भक्तांनी गर्दी केली होती. तर, या प्रदर्शनात महागडे घोडेही सामील झाल्याने अनेक अश्वप्रेमींनी या जत्रेत घोड्याचं नूत्य पाहण्यासाठी गर्दी केली होती.
घोड्यांची होणारी बदनामी ही चिंताजनक : महानंदाचे माजी अध्यक्ष आणि घोडा स्पर्धा आयोजक रणजितसिंह देशमुख म्हणाले की, या घोडा प्रदर्शनात राज्यभरातून घोडामालक आपले घोडे घेऊन आले होते. सर्वांच्या सहभागातून हे अश्वप्रदर्शन यशस्वी होत असून, घोडा हा निष्ठावान आणि स्वामीनिष्ठ प्राणी आहे. तो कायम मालकाशी प्रामाणिक राहिला आहे. मात्र, सध्याचा होणारा राजकीय घोडेबाजार आणि त्यातून घोड्यांची होणारी बदनामी ही चिंताजनक असल्याची खंतही त्यांनी सध्याच्या राजकारणाबाबत व्यक्त केली.
हेही वाचा :
1 पुण्यातील ड्रग्ज प्रकरण; वीरेंद्र सिंग बरोरियाला बजावली लुक आऊट नोटीस
2 "आपला इगो बाजूला ठेवून...", आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना सुनावले खडे बोल
3 बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील संप मागे, सरकार आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा