ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीसांशिवाय सरकारचं पान हलत नाही - मनोज जरांगे पाटील - Manoj Jarange Patil - MANOJ JARANGE PATIL

Manoj Jarange On Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या पुण्यात असून यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. मुखमंत्री असो की उपमुख्यमंत्री पण देवेंद्र फडणवीसांशिवाय सरकारचं पान हलत नाही, अशी टीकाही त्यांनी केलीय.

Manoj Jarange Patil criticized Devendra Fadnavis during press conference at Pune
मनोज जरांगे पाटील, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2024, 5:12 PM IST

पुणे Manoj Jarange On Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय सरकारमधील पानही हलत नाही.‌ मुख्यमंत्री कोणीही असो निर्णय फडणवीसच घेतात, अशी टीका त्यांनी केलीय. सोमवारी (2 सप्टेंबर) भीमाशंकरचं दर्शन घेण्यासाठी ते पुणे जिल्ह्यात आले होते. त्यानंतर आज (3 सप्टेंबर) सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

मनोज जरांगे पाटील पुणे पत्रकार परिषद (ETV Bharat Reporter)

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील : यावेळी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस कोणालाही काम करू देत नाही. ना सगेसोयरे ना शेतकरी यांच्या कोणाच्याही प्रश्नावर ते काम करत नाही. ते केवळ मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय." तसंच छगन भुजबळ यांच्या माध्यमातून जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम फडणवीस यांनी केलंय, असा गंभीर आरोपही जरांगे पाटलांनी केलाय.

दहशतीनं निवडणूक जिंकता येत नाही : पुढं ते म्हणाले, "विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली. मात्र, कोणताही निर्णय झाला नाही. पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि मग ठरवू की निवडणूक लढवायची की 288 पाडायचे. अजूनही फायनल निर्णय हा झालेला नाही. आम्ही रणनीती उघड करणार नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस पुन्हा डाव करतील. दहशतीनं निवडणूक जिंकता येत नाही तर मायेनं जिंकता येते", असंही जरांगे पाटील म्हणाले.

फडणवीसांचे जवळचे मला भेटतात : देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मला येऊन गुपचूप भेटतात आणि फडणवीसांची तक्रार करतात. ते सांगतात की अगोदर आम्हाला पुढं केलं जातं आणि मग आम्हालाच संपवलं जात आहे. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळं उघड करेन, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. पुढं ते म्हणाले, "माझ्यावर खोटा खटला दाखल करण्यात आला. मराठवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचावा यासाठी आम्ही नाटक आणलं होतं. त्यात तोटा आला. आम्ही आमच्या परीनं पैसे दिले. जबाबदारी वाटून घेतली. पण माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खोटा खटला दाखल केला", असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा -

  1. पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, कमराबंद चर्चेमुळं राजकीय वर्तुळात खळबळ - Maharashtra Politics
  2. ...तर मी राजीनामा देवून राजकारणातून निवृत्ती जाहीर करेन; देवेंद्र फडणवीसांचं मनोज जरांगे पाटलांना चॅलेंज - Devendra Fadnavis Resign Retirement
  3. "...तर मी राजकारणातून संन्यास घेईन", असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस? - Devendra Fadnavis News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.