मुंबई Kangana Ranaut Controversial Statement : अभिनेत्री कंगना रणौत आणि वाद हे त्यांच्या चाहत्यांसाठी नवीन नाहीय. कोणत्या ना कोणत्या कारणावरून कंगना रणौत कायम वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. आता खासदार म्हणून निवडून आल्यानंतर चारच दिवसात कंगना रणौत एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. चंदीगड विमानतळावर CISF महिला जवान कुलविंदर कौर यांनी थेट रणौत यांच्या कानशिलात लगावली. या वादानंतर कुलविंदर कौर यांचं निलंबन करण्यात आलं आहे. या प्रकारानंतर वाद कंगना रणौत यांची पाठ सोडत नसल्याचं दिसतंय. लोकप्रतिनिधी असणाऱ्या कंगना रणौत यांनी पूर्वीसारखी बेताल वक्तव्य करणं योग्य आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या आगोदरही कंगना रणौत यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.
भीक मागून स्वातंत्र्य मिळालं : अभिनेत्री कंगना रणौत यांनी भारताला 1947 साली भीक मागून स्वातंत्र्य मिळालं. मात्र, खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होता. त्यानंतर देशभरात बराच वाद निर्माण झाला होता.
गांधीजी सत्तेसाठी भुकेले नेते : गांधीजी सत्तेसाठी भुकेलेले होते. तुम्हाला एका गालावर मारलं, तर दुसरा गाल पुढे करा, असं ते म्हणत होते. यामुळं केवळ स्वांतत्र्य नाही, तर भीक मिळते. तुमचे हिरो समजदारीनं निवडा, असं रणौत यांनी म्हटलं होतं. त्यावर विरोधकांनी वादंग उठवलं होतं.
ममता बॅनर्जी यांच्यावर वादग्रस्त पोस्ट : बंगालामध्ये विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा विजय झाला होता. त्यानंतर बंगलामध्ये हजारो लोकांची हत्या झाली, असा आरोप कंगना यांनी केला होता. तसंच ममता बॅनर्जी यांच्यावरही वादग्रस्त पोस्ट केली होती. यावरुन रणौत यांना ट्रोल करण्यात आलं होतं. या पोस्टनंतर रणौत यांचं ट्विटर अकाऊंट काही काळासाठी बंद करण्यात आलं होतं.
रणौत-जावेद अख्तर वाद : एका मुलाखतीत रणौत यांनी जावेत अख्तर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. त्यानंतर गीतकार जावेद अख्तरांनी कंगनाविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. तसंच त्यांनी थेट कंगनाविरोधात कोर्टात धाव घेतली होती. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर शबाना आजमी पाकिस्तानात कार्यक्रमासाठी जाणार होत्या. त्यावरुन देखील रणौत यांनी शबाना आझमी तसंच जावेद अख्तर यांच्यावर टीका केली होती.
एका-एकाला बर्बाद करणार : मणिकर्णिका सिनेमा प्रदर्शित होण्याआधी करणी सेनेकडून कंगना यांना धमकी देण्यात आली होती. "मी राजपूत आहे. मला त्रास देणं बंद केलं नाही, तर एका-एकाला बर्बाद करेन", असं कंगना रणौत यांनी प्रतिउत्तर दिलं होतं.
कल तेरा घमंड टुटेगा : मविआ सरकारच्या काळात मला मुंबईत सुरक्षित वाटत नसून, मुंबई हा पाकिस्तानचा भाग असल्याचं वक्तव्य रणौत यांनी केलं होतं. यानंतर मुंबई पालिकेनं रणौत यांच्या अनाधिकृत कार्यालयावर बुलडोझर चालवला होता. त्यावेळी रणौत यांनी 'आज मेरा घर टुटा है, कल तेरा घमंड टुटेगा' असा टोमना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला होता.
शेतकऱ्यांचा उल्लेख दहशतवादी : रणौत यांनी शेतकऱ्यांवर देखील टीका केली होती. दिल्लीत विविध मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कंगना रणौत यांनी दहशतवादी म्हटलं होतं. यावरुन रणौत यांच्यावर बरीच टीका झाली होती. 100 रुपयांसाठी शेतकरी आंदोलनाला बसले आहेत, असं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
ऋतिक रोशनवर गंभीर आरोप : अभिनेता ऋतिक रोशनवर कंगना रणौत यांनी गंभीर आरोप केले आहेत. ऋतिकनं आपलं लैगिक शोषण केल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावरुन दोघांमध्ये बराच वाद झाला होता. तसंच बॉलिवूडमध्ये मोठा भेदभाव केला जातो, असंही कंगना रणौत यांनी म्हटलं होतं. अशा वादामुळं कंगना रणौत देशभरात कायम चर्चेत आहे.
पंजाबमध्ये दहशतवाद वाढतोय : खासदार झाल्यानंतर कंगना यांच्याबात पहिल्या वाद चंदीगड विमानतळावर घडला आहे. मी दिल्लीला जात असताना चंदीगड विमानतळावर CISF महिला जवान कुलविंदर कौर यांनी मला शिवीगाळ करत मला मारहाण केलीय. यावरून दिसंतय की पंजाबमध्ये दहशत, हिंसाचारात वाढतोय, असं रणौत म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर पंजाबमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
कसा आहे कंगना यांचा बॉलिवूडमधील प्रवास? : कंगना रणौत यांची वादग्रस्त अभिनेत्री म्हणून ओळख आहे. मंडी ते मुंबई असा रणौत यांचा सिनेसृष्टीतील प्रवास आहे. अभिनयाची सुरुवात कंगना रणौत यांनी ‘रामायण’ मालिकेतून केली होती. 2006 साली 'गँगस्टर' चित्रपटातून कंगना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटासाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. आतापर्यंत कंगना यांना 5 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तसंच अनेक यशस्वी चित्रपट कंगना रणौत यांनी भूमीका साकारल्या आहेत. यात ऐतिहासिक चित्रपटांचा देखील समावेश आहे.
हे वाचलंत का :
- उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्याचे भाजपाचे प्रयत्न; शिवसेनेचे सहा आमदार करणार घरवापसी? - Lok Sabha Election Results 2024
- महाराष्ट्रात भाजपाच्या सुमार कामगिरीचे साईड इफेक्ट्स; संघटनात्मक फेरबदलाची दाट शक्यता - BJP in Maharashtra
- राष्ट्रवादीच्या काही लोकांनी काम केलं नाही, पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यांचा भुजबळांवर निशाणा - Hemant Godse On Election 2024