ETV Bharat / state

बंदाघाटावर महिलेला बोलावलं भेटायला, मग भल्या पहाटे चाकूनं भोसकलं; विवाहितेचा खून करुन तरुणाची आत्महत्या - Man Killed Women

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2024, 10:41 AM IST

Man Killed Women : अनैतिक संबधातून एका 40 वर्षीय महिलेचा तिच्या कथित प्रियकरानं खून केल्याची घटना नांदेड शहरातील बंदाघाटावर घडली. या घटनेतील मारेकरी तरुणानं आत्महत्या करुन आपलंही जीवन संपवलं. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.

Man Killed Women
प्रतिकात्मक छायाचित्र (ETV Bharat)

नांदेड Man Killed Women : अनैतिक संबधातून एका 40 वर्षीय महिलेचा तिच्याचं 28 वर्षीय कथित प्रियकरानं खून केल्यानं मोठी खळबळ उडाली. महिलेचा खून केल्यानंतर तरुणानं आपल्या गावी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी नांदेड शहरात घडली. संतोष आलेवाड असं विवाहितेचा खून करुन आत्महत्या करणाऱ्या कथित प्रियकराचं नाव आहे. खून करण्यापूर्वी संतोष आलेवाड यानं महिलेला भेटण्यासाठी शहरातील बंदाघाटावर बोलावलं. मात्र बंदाघाटावर दोघात वाद झाला. त्यानंतर या वादातून संतोष आलेवाड यानं हे कृत्य केलं असावं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर विवाहितेला रुग्णालयात दाखल केलं. मात्र विवाहितेची प्राणज्योत मालवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही या घटनेतील मारेकऱ्याचा शोध घेतला असता, त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालं. - वाटाणे, सहायक पोलीस निरीक्षक

रक्तपेढीत काम करताना जुळलं सूत : या घटनेतील कथित प्रियकर संतोष रामराव आलेवाड हा आणि विवाहिता शहरातील एका खासगी रक्तपेढीत कामाला होते. मात्र नोकरी करताना त्यांचं सूत जुळलं. या घटनेतील विवाहितेला दोन मुली आहेत. संतोष आलेवाड याच्याशी महिलेचं सूत जुळल्यानंतर पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन त्यांच्यात कटुता आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गावाकडून परतल्यानंतर बंदाघाटावर केला खून : संतोष आलेवाड हा मूळचा नायगाव तालुक्यातील लालवंडी या गावाचं होता. त्यानं शनिवारी पहाटे लालवंडी गावातून नांदेड शहर गाठलं. यावेळी त्यानं विवाहितेला बंदाघाटावर बोलावलं. यावेळी संतोष आणि विवाहितेत पैशाच्या वादातून भांडण झालं. त्यातूनच संतोष आलेवाड यानं महिलेवर चाकूनं सपासप वार करुन तिचा निर्घृण खून केला. विवाहितेचा खून केल्यानंतर संतोष आलेवाड यानं घटनास्थळावरुन आपल्या दुचाकीनं फरार झाला. "घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर विवाहितेला रुग्णालयात दाखल केलं. मात्र विवाहितेची प्राणज्योत मालवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही या घटनेतील मारेकऱ्याचा शोध घेतला असता, त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालं," अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक वाटाणे यांनी दिली.

विवाहितेचा खून केल्यानंतर तरुणाची आत्महत्या : विवाहितेचा खून केल्यानंतर मारेकरी संतोष आलेवाड हा आपल्या गावी लालवंडी इथं पोहोचला. त्यानं शेतात जाऊन एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोष आलेवाड यानं आत्महत्या का केली, याबाबत मोठी खळबळ उडाली. मात्र त्यानंतर पोलीस तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्याचा माग काढत गावात पोहोचले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. या घटनेतील मारेकरी संतोष आलेवाड यानं आपल्या एका मित्राला "मी विवाहितेचा खून केला आहे. आता मी देखील आत्महत्या करणार आहे," असं सांगून फोन बंद केला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. पुण्यात प्रियकरानं केली सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रेयसीची हत्या; 'Oyo' मध्ये झाला गेम
  2. Uncle Killed Nephew : मुलासोबत बोलत असल्याच्या रागातून काकाने केला पुतणीचा खून; दोघांमध्येही होते अनैतिक संबंध
  3. जुगाराच्या नादात वृद्ध महिलेची हत्या; घराला आग लावून दागिनेही पळवले; आरोपीला 36 तासात अटक - Bhiwandi Crime News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.