ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2024 : हरियाणाची पुनरावृती महाराष्ट्रात होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

हरियाणामध्ये भाजपानं सगळे एक्झिट पोल खोटे ठरवले आहेत. हरियाणाची पुनरावृती महाराष्ट्रात होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात बोलताना व्यक्त केला.

Assembly Election 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2024, 10:10 AM IST

Updated : Oct 18, 2024, 2:38 PM IST

पुणे : हरियाणामध्ये झालेल्या निवडणुकीतील सगळे अंदाज फोल ठरवत भाजपानं मोठी मुसंडी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चमत्कार आणि त्यांच्या कामाची पोचपावती तिथल्या जनतेनं दिली आहे. तिथं देखील डबल इंजिन सरकार होतं. जनतेनं त्यांना साथ दिली आहे. आता महाराष्ट्रात देखील हरियाणाची पुनरावृत्ती होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. चंदीगड इथल्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याकडं जाताना पुणे विमानतळावर बोलत होते.

कल्याणकारी योजनेची पोचपावती जनता देणार : एकीकडं राज्यात महाविकास आघाडीनं प्रकल्प बंद केले होते, ते आम्ही सुरू केले आहेत. राज्यात नवीन उद्योग आणून कल्याणकारी योजना देखील राबवल्या आहेत. लाडकी बहीण योजनेपासून ते अनेक योजना महायुतीच्या माध्यमातून राबवण्यात आल्या. याची पोचपावती येत्या निवडणुकीत जनता आम्हाला नक्कीच देणार आहे, असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

विधानसभा निवडणूक 2024 : हरियाणाची पुनरावृती महाराष्ट्रात होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास (Reporter)

हरियाणा निकालानं सगळे एक्झिट पोल फेल ठरवले : चंदीगड इथं हरियाणाचे मुख्यमंत्री नायब लिंह सैनी यांचा शपथविधी कार्यक्रम होता. या शपथविधी कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, अतिशय चांगला आणि मोठा उत्साह पाहायला मिळाला. हरियाणाचे निकाल आपण जर पाहिले तर या निकालानं सर्वच सर्व्हे आणि एक्झिट पोल फेल ठरवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चमत्कार आणि त्यांच्या कामाची पोचपावती तिथल्या जनतेनं दिली आहे. पुन्हा नायब सिंह सैनी हे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या शपथविधीला जायची संधी मिळाली याचा आनंद आहे, असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाली बैठक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खांद्यावर हात टाकला, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारलं. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सर्वच राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली. या बैठकीत एनडीएच्या घटक पक्षाचे जेवढे राज्य आहेत, त्या राज्यांमध्ये विकास तसेच कल्याणकारी योजना याबाबत बैठकीत चर्चा झाली. जवळपास पाच तास ही बैठक झाली असून अशी बैठक वर्षातून दोनवेळा व्हायला पाहिजे, असं सगळ्यांचं म्हणणं होतं."

जागा वाटपाबाबत महायुतीमध्ये वाद नाही : जागा वाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता, ते म्हणाले की, "जागा वाटपामध्ये काहीही अडचण नाही. सगळं समन्वयानं होणार आहे. आता महाविकास आघाडीमध्ये काय गोंधळ चालला आहे, हे त्यांना विचारा. या निवडणुकीत महायुतीचा परफॉर्मस अतिशय चांगला राहणार आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे. जे लोक घरी बसले आहेत, त्यांना राज्यातील सरकार कायमचं घरी बसवणार आहे. काम करणाऱ्यांना जनता पुन्हा संधी देणार आहे," असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा :

  1. नवनियुक्त आमदार हेमंत पाटील यांचं नांदेडमध्ये जंगी स्वागत, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
  2. इकडं आड, तिकडं विहीर : शिवसेनेच्या आमदारांना अस्तित्वाची लढाई, 'या' मतदार संघात भाजपाचा उघड विरोध
  3. "उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेर पडले नाहीत, एकनाथ शिंदे म्हणजे 'पुष्पा' "; राज ठाकरेंनी डिवचलं

Last Updated : Oct 18, 2024, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.