छत्रपती संभाजीनगर Prakash Ambedkar : "मनोज जरांगे ओबीसींच्या बासरीतून सूर काढत आहेत. त्यामुळं त्यांना ना बजेगी बासरी न बजेगा सूर अशी भूमिका घ्यायची आहे," असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेत केला. विधानसभा निवडणुकीत 100 ओबीसी आमदार निवडून आणा, अन्यथा तुमचं आरक्षण धोक्यात आल्याचं समजा,"असं देखील ते म्हणाले. रक्षण बचाव यात्रेचा समारोप आज अमखास मैदान येथे करण्यात आला. त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका मांडली.
यात्रा काढल्यानं शांतता : "समाजात असलेली परिस्थिती बिकट होत असताना आमच्या आरक्षण यात्रेनं समाजात शांतता निर्माण झाली आहे. आरक्षणाबाबत प्रश्न निर्माण होतील. आम्ही राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढली. त्यामुळं गावागावात निर्माण झालेली अशांतता कमी झाली. अनेक ठिकाणी एकमेकांना कमी लेखलं जात होतं. मात्र ती परिस्थिती राहणार नाही. लोकांना जागरूक करण्याचं काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला. छगन भुजबळ म्हणत होते, की 1977 सारखी परिस्थिती निर्माण होणार आहे. तो, काळ आजच्या पिढीला माहिती नाही. शरद पवार म्हणत होते की, मणिपूरसारखी परिस्थिती राज्यात निर्माण होणार आहे. मात्र, आमची यात्रा निघाल्यानं आता तशी परिस्थिती उद्भवणार नाही. पोलीस यंत्रणेनंदेखील आभार मानले आहेत. आंदोलन करत असताना दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जात आहे," असा आरोप आंबेडकर यांनी केला.
१०० आमदार निवडून आणा : "ओबीसींचं आरक्षण वाचवायचा असेल, तर विधानसभा निवडणुकीत किमान 100 ओबीसी आमदार निवडून आणावे लागतील. एखादा ठराव पारित करायचा असल्यास 145 मतांची गरज पडते. त्यामुळं 100 आमदार ओबीसी समाजाच्या मतांवर निवडून आलेले असायला हवेत. मराठा समाजाच्या मतांवरवरचे आमदार निवडून आले, तर ते आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर न करता त्यांच्या बाजूनं निर्णय देतील. त्यामुळं या विधानसभा निवडणुकीत ओबीसी आरक्षण वाचवायचं असल्यास समाजानं विचारूनच मतदान करावं," असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
हिंदुत्वाला नाही तर आरक्षणाला धोका : "जरांगे पाटील यांच्या ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या भूमिकेला आधीही पाठिंबा नव्हता, आजही नाही. मराठा समाज मंडल कमिशन आलं, त्यावेळीदेखील फरक करायला तयार नव्हता. मराठ्यांमध्ये दोन वर्ग आहेत. वारसा हक्कानं जमिनी असलेला वर्ग आणि कसेल त्याची जमीन असणारा वर्ग आहे. आतापर्यंत आलेल्या सर्व कमिशननं हा प्रश्न लक्षात न घेतल्यानं हा प्रश्न आहे. मराठा समाज पेटून उठला आहे. आरक्षण मिळाले, तर तलाठी आणि ग्रामसेवक होऊ, असं त्यांना वाटतं. निवडणुकीत आरक्षण पाहिजे का नाही हे ठरवलं पाहिजे. मंडल कमिशन आलं त्यावेळी देखील राजकीय पक्ष नव्हते आणि आजही नाहीत," असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
'हे' वाचलंत का :
- गुंडगिरीला पाठबळ देणारं महायुती सरकार, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बेरोजगारी महागाईच्या मुद्द्यांना प्राधान्य देणार- पटोले - Nana Patole
- विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांवर बहिष्कार टाका - रामदास आठवले - Ramdas Athawale Vs MNS
- "मोदी है तो मुमकिन है", विनेश फोगाटच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा - Jayant Patil on vinesh phogat