ETV Bharat / state

नागपुरात सैन्य जवानांच्या ऑटोला खासगी बसची धडक; दोन जवानांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती - Maharashtra politics live updates - MAHARASHTRA POLITICS LIVE UPDATES

Maharashtra politics live updates
Maharashtra politics live updates (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 16, 2024, 7:20 AM IST

Updated : Jun 16, 2024, 9:23 PM IST

Maharashtra Breaking News : 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. राज्य, देश आणि विदेशातील महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजसाठी या पेजवर अपडेट पाहत राहा. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या /mr/maharashtra

LIVE FEED

9:22 PM, 16 Jun 2024 (IST)

नागपुरात सैन्य जवानांच्या ऑटोला खासगी बसची धडक

सैन्य जवानांच्या ऑटोला खासगी बसची धडक, अपघातात ऑटोमध्ये प्रवास करणारे ८ जवान गंभीर जखमी

जखमींपैकी दोन जवानांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती (अद्याप दुजोरा नाही)

सर्व ८ जवान कान्हान येथून कामठी मिलिटरी कॅम्पमध्ये जात असताना भरधाव बसने ऑटोला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये एक ऑटो चालकासह ८ जवान जखमी झाले आहेत

जखमी जवानांपैकी ३ जखमी कामठी येथील आशा हॉस्पिटल, 3 जवान इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि २ जवानांना शासकीय वैद्यकीय महाविद्याल (मेडिकल) च्या ट्रॉम केअरमध्ये पाठवण्यात आले

जखमींपैकी दोन जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे तर तीन जवान सिरियस आहेत

9:09 PM, 16 Jun 2024 (IST)

एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात राज्यातील ३७ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले आहेत.

7:17 PM, 16 Jun 2024 (IST)

सलमान खानला युट्यूबवरून धमकी देणाऱ्याला पोलीस कोठडी

सलमान खानला युट्यूबवरून धमकी देणाऱ्या आरोपी बनवारीलाल गुजर याला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली आहे.

5:21 PM, 16 Jun 2024 (IST)

ईव्हीएम हॅक होणं शक्य नाही

निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचं स्पष्टीकरण

ईव्हीएम हॅक होणं शक्य नाही

ईव्हीएम ओटीपीवर ओपन होत नाही

अज्ञात माणसाने मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरल्याची तक्रार आहे

डेटा अपडेटसाठी काहींना मोबाईल दिला होता

4:03 PM, 16 Jun 2024 (IST)

अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीला घेऊन गुन्हे शाखेचं पथक मुंबईत दाखल

युट्युबवर व्हिडिओ पोस्ट करून सलमानला मारण्याची दिली होती धमकी

राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील बोर्डा गावातून अटक

बिश्नोई गँगच्या नावाने दिली होती धमकी

बनवारीलाल गुजर नावाच्या आरोपीने युट्यूबवर व्हिडिओ बनवून दिली होती धमकी

12:14 PM, 16 Jun 2024 (IST)

उत्तर पश्चिम (वायव्य) मतदारसंघातील लोकसभा निवडणूक निकाल पुन्हा चर्चेत, राहुल गांधींनी काय केली पोस्ट?

रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत चिंता व्यक्त केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, " देशातील ईव्हीएम हा एक 'ब्लॅक बॉक्स' आहे. कोणालाही ब्लॅक बॉक्सची छाननी करण्याची परवानगी नाही. आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा ( निवडणूक आयोग) संस्थांमध्ये उत्तरदायित्व नसते तेव्हा लोकशाही एक लबाडी बनते. तेव्हा फसवणूक होण्याची शक्यता असते."

10:29 AM, 16 Jun 2024 (IST)

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शाह आज घेणार बैठक

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नवी दिल्लीत बैठक घेणार आहेत. या बैठकीला जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल, जम्मू-काश्मीर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थिती आणि विशेषत: आगामी अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेवर या बैठकीत चर्चा होणार आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरून होणाऱ्या घुसखोरीला पायबंद घालण्याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

10:16 AM, 16 Jun 2024 (IST)

गेली १० वर्षे मोदी-शाह यांनी देशाचे नुकसान केले-संजय राऊत

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. खासदार राऊत म्हणाले, " शिवसेनेबाबत राहुल नार्वेकरांकडून घटनाबाह्य निर्णय घेण्यात आला. लोकसभा अध्यक्ष पद भाजपाकडं आल्यास ते चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, चिराग पासवान यांचा पक्ष फोडतील. ज्यांच्याबरोबर खायला बसतील, त्यांनाच ते संपवितात. लोकसभा अध्यक्षपदांसाठी चंद्राबाबूंनी उमेदवार दिला तर त्यांना पाठिंबा देऊ. लोकसभेचे उपाध्यक्षपद कायद्यानं विरोधकांना मिळायला हवे. मोदी हे टेकूवर बसले आहेत. राहुल गांधी यांनी सांगितले, हे सरकार कधीही पाडू शकतो. त्याचा अर्थ तुम्ही समजला पाहिजे. हे सरकार स्थिर नाही. गेली १० वर्षे मोदी-शाह यांनी देशातील लोकशाही, देशाची सुरक्षा यांचे नुकसान झाले. या नुकसानीला आरएसएसहेदेखील जबाबदार आहे."

10:01 AM, 16 Jun 2024 (IST)

गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानं घराला लागली भीषण आग, यवतमाळमधील घटना

यवतमाळमध्ये एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानं भीषण आग लागली. भीषण आगीमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या आगीमुळे परिसरात धूर पसरला.

9:42 AM, 16 Jun 2024 (IST)

शंभरी ओलांडूनही पद्मश्री स्वामी शिवानंद करतात योगासने

मुंबई: योगगुरू, पद्मश्री स्वामी शिवानंद हे नियमितपणे योगासन करतात. त्यांनी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी एका कार्यक्रमात योग केला. त्यांचं वय सुमारे 127 वर्षे वय असल्याचा दावा करण्यात येत आहे. दीर्घायुष्य होण्यासाठी योग हा एकमेव पर्याय असल्याचं स्वामी शिवानंद यांनी सांगितलं.

7:07 AM, 16 Jun 2024 (IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णा हजारे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांना दूरध्वनीद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी हजारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं.

Last Updated : Jun 16, 2024, 9:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.