ETV Bharat / state

मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा: नागपूरला दुसऱ्यांदा शपथविधी सोहळ्याचा सन्मान, जाणून घ्या 'या' ऐतिहासिक सोहळ्याची रंजक माहिती - MAHARASHTRA CABINET EXPANSION

21 डिसेंबर 1991साली उपराजधानी नागपुरात मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला होता. तेव्हा छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.

MAHARASHTRA CABINET EXPANSION
1991 साली झालेल्या शपथविधीचा इतिहास (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

नागपूर : महायुती सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) पार पडणार आहे. दुपारच्या सुमारास नागपुरातील राजभवनात शपथविधी सोहळा होईल. 21 डिसेंबर 1991 साली उपराजधानी नागपुरात मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला होता. तेव्हा छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. तर वसुधा देशमुख, राजेंद्र गोडे, भरत बाहेकार, शंकर नम, जयदत्त क्षीरसागर आणि शालिनी बोरसे या 6 उपमंत्र्यांनी (राज्य मंत्री नाही) शपथ घेतली होती.

काय घडलं होतं 1991 मध्ये? : 1 डिसेंबर 1991 साली झालेल्या शपथविधी सोहळ्याच्या दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना छगन भुजबळ त्यांच्या 11 सहकारी आमदारांसह शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले होते. तेव्हा भुजबळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाईल, अशी चर्चा होती. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी सुधाकरराव नाईक 19 डिसेंबरच्या रात्री उशिरा नागपुरातून हिवाळी अधिवेशन सोडून दिल्लीला गेले होते. 20 डिसेंबरच्या सकाळी दिल्लीतून ते थेट मुंबईला परतले आले. 20 डिसेंबरच्या दुपारी सुधाकरराव नाईक यांनी तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांना नव्या मंत्र्यांची यादी मुंबईत सोपवली होती. त्यानंतर 20 डिसेंबरच्या रात्री उशिरा सुधाकरराव नाईक यांनी नागपुरात येऊन आपण छगन भुजबळ आणि काही उपमंत्र्यांना मंत्रिमंडळात घेत आहोत, असं पत्रकारांसमोर जाहीर केलं होतं.

सरकारचं मंत्रिमंडळ त्रिस्तरीय : दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच 21 डिसेंबरला तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रमण्यम हे तातडीनं मुंबईवरून नागपूरला आले होते. दिवसभर अधिवेशनाचं कामकाज चालल्यानंतर संध्याकाळी अधिवेशन संपल्यानंतर साडेचार वाजता नागपुरातील राजभवनात 1 कॅबिनेट मंत्री आणि 6 उपमंत्र्यांना शपथ दिली गेली होती. त्या मंत्रिमंडळ विस्तारामुळं तेव्हाचे सुधाकरराव नाईक यांच्या सरकारचं मंत्रिमंडळ त्रिस्तरीय (कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री) झालं होतं.

विशेष माहिती - स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासात नागपुरात दोनच वेळेला शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला.

  • 21 डिसेंबर 1991 मध्ये सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा पार पडला.
  • आज देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा पार पडणार आहे.

मात्र महाराष्ट्राच्या निर्मिती पूर्वी म्हणजेच 1952 मध्ये वसंतराव नाईक यांचा नागपूर येथे तत्कालीन मध्य प्रांतच्या सरकारमध्ये उपमंत्री म्हणून छोटा शपथविधी सोहळा पार पडला होता. (म्हणजेच नागपुरातला हा तिसरा मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा आहे. तर 1960 मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतरचा दुसरा शपथविधी सोहळा आहे.)

हेही वाचा

  1. महायुतीत गेल्या सरकारमधील 'या' मंत्र्यांना मंत्रिपदासाठी फोन नाहीच; मंत्रिमंडळातून डच्चू?
  2. फोन आला का? मंत्रिपद शपथविधीपूर्वी महायुतीच्या नेत्यांची उडतेय धांदल
  3. विरोधकांचा संविधानावर विश्वास नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.