ETV Bharat / state

मनोज जरांगे यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी; ओबीसी हक्क संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा - Maharashtra breaking news live

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 7:52 AM IST

Updated : Jun 23, 2024, 6:50 PM IST

Maharashtra breaking news live updates
Maharashtra breaking news live updates (Source- ETV Bharat)

Maharashtra Breaking News Live Updates : 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. राज्य, देश आणि विदेशातील सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या पेजवर पाहता आणि वाचता येतील. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या पुढील वेबसाईटला नक्की भेट द्या - https://www.etvbharat.com/mr/maharashtra

LIVE FEED

6:49 PM, 23 Jun 2024 (IST)

मनोज जरांगे यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी

पालघर : राज्यात ओबीसी समाज साठ टक्के असून या समाजाला वेठीला धरण्याचा प्रयत्न मराठा आरक्षणाच्या माध्यमातून होत आहे. आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कदापि यशस्वी होऊ देणार नाही. मनोज जरांगे विकृत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ओबीसी हक्क संघर्ष समितीचे उपाध्यक्ष कुंदन संखे यांनी केली.

4:44 PM, 23 Jun 2024 (IST)

उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषद भोवणार? निवडणूक आयोगाने मागवला अहवाल

मुंबई : राज्यात 20 मे रोजी पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी लोकसभेचे मतदान पार पडले होते. मात्र, यावेळी मुंबईतील विविध भागात अतिशय संथगतीने मतदान झालं असून, काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, वीज खंडित असे प्रकार घडल्याचे म्हणत याप्रकरणी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, मतदान करण्याची वाढीव वेळ मिळावी आणि याची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करत काही आरोप केले होते. मात्र आता या पत्रकार परिषदेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाकडून अहवाल मागवला आहे.

12:49 PM, 23 Jun 2024 (IST)

दिल्लीच्या मंत्री आतिशी यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच, हरियाणातून पाणी येत नसल्याचा दावा

नवी दिल्लीतील पिण्याच्या पाण्याचे संकट दूर करण्यासाठी दिल्लीच्या मंत्री यांचे सलग तिसऱ्या दिवशी उपोषण सुरू आहे. आतिशी यांनी आज सांगितले की," हरियाणातील हथिनी कुंड पाण्यानं भरलें आहे. परंतु तेथील सरकारने दिल्लीसाठी येणारे बंद केले आहेत. दिल्लीतील लोकांना हक्काचे पाणी मिळेपर्यंत सत्याग्रह सुरूच राहणार असल्याचे आतिशी यांनी सांगितलं.

9:41 AM, 23 Jun 2024 (IST)

अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी केला पराभव

अफगाणिस्ताननं टी-20 विश्वचषकाच्या सुपर 8 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला 127 धावावर सर्व बाद केले.

8:56 AM, 23 Jun 2024 (IST)

'पुष्पक'ने केलं अचूक लँडिंग, इस्त्रोला सलग तिसऱ्यांदा यश

इस्रोनं रियुझेबल लाँच व्हिकल (RLV) लँडिंग एक्सपिरेमेंटमध्ये (LEX) आज सलग तिसऱ्यांदा आणि अंतिम यश मिळविलं. 'पुष्पक'ने अचूक लँडिंग केले. यामधून इस्रोनं अवकाशासाठी असलेले अद्ययावत तंत्रज्ञान भारताकडं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

8:51 AM, 23 Jun 2024 (IST)

बंद असलेल्या बायोगॅस प्रकल्पाच्या खड्ड्यात पडून ५ वर्षीय बालकाचा मृत्यू

मुंबई- बंद असलेल्या बायोगॅस प्रकल्पाच्या खड्ड्यात पडून ५ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना मीरा रोड परिसरात घडली. प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३०४-अ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.

7:47 AM, 23 Jun 2024 (IST)

आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याच्या कारनं चिरडले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे- खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यानं दुचाकीस्वार तरुणाला चिरडले. या अपघातात दुचाकीस्वार ओम भालेराव जागीच ठार झाला. हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर एकलहरेजवळ घडला. मंचर पोलिसांत आमदार पुतण्यावर रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला.

Last Updated : Jun 23, 2024, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.