ETV Bharat / state

कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष; जाणून घ्या, त्यांची राजकीय कारकिर्द - KALIDAS KOLAMBKAR NEWS

भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पदाची शपथ दिली.

BJP MLA Kalidas Kolambkar
कालिदास कोळंबकर (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2024, 9:54 AM IST

Updated : Dec 6, 2024, 2:01 PM IST

मुंबई: भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर हे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार आहेत. विधिमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी प्रक्रियेचा भाग म्हणून हंगामी अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. आमदार कोळंबकर हे सलग नवव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत.

भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. हंगामी अध्यक्ष म्हणून ते 15 व्या विधानसभेच्या 288 नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहेत. 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे.

कोण आहेत कालिदास कोळंबकर - कालिदास कोळंबकर हे 15 व्या विधानसभेतील सर्वात अनुभवी आमदार आहेत. सर्वाधिक आमदारकीचा कार्यकाळ अनुभवला असल्यानं कोळंबकर यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. कालिदास कोळंबकर यांनी शिवसेनेतून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी 1990 पासून सातत्यानं विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'च्या घोषणेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नव्हे तर मतदारसंघातील अल्पसंख्यांक उमेदवार पाठीशी राहील, असा विश्वास व्यक्त केला होता. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपा या तीन पक्षांकडून विधानसभेची निवडणूक लढवण्याची आणि प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवण्याच्या पराक्रमाची कालिदास कोळंबकर यांच्या नावावर नोंद आहे.

पहिल्या निवडणुकीत गृहराज्यमंत्र्यांचा पराभव: कालिदास कोळंबकर हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान भाजपा खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. 1990 ते 2004 या काळात त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवून जिंकली. नारायण राणेंबरोबर कोळंबकर शिवसेनेतून बाहेर पडले होते. कोळंबकर यांनी पहिल्या निवडणुकीत तत्कालीन गृह राज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास सावंत यांचा पराभव केला होता. यंदाच्या वडाळा विधानसभा निवडणुकीत भाजपा नेते कोळंबकर यांनी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) उमेदवार आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा पराभव केला. नवव्यांदा कालिदास कोळंबकर हे मुंबई शहरात मध्यवर्ती मतदारसंघ असलेल्या वडाळा विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत.

  • 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीनं विधानसभेच्या 288 जागांपैकी 230 जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर विधिमंडळाचे पहिले हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबर दरम्यान नागपुरात होणार आहे.

हेही वाचा-

  1. पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अनेक आव्हानं
  2. सुडाचं राजकारण भाजपानं सुरू केलं; आता महाराष्ट्राचं पुढं काय होईल, संजय राऊतांचा सवाल
  3. राज्यात 'देवेंद्र' पर्वाला सुरुवात; एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी विराजमान

Last Updated : Dec 6, 2024, 2:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.